• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राज्यात आजपासून पावसाची शक्यता

by Guhagar News
November 23, 2023
in Ratnagiri
89 1
0
Chance of rain in the state from today
175
SHARES
499
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई, रत्नागिरीला यलो अलर्ट जारी

मुंबई, ता. 23 : राज्यात आजपासून पुढील ४-५ दिवस पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. तर २५ आणि २६ नोव्हेंबर रोजी मुंबईसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. Chance of rain in the state from today

मुंबईसाठी २५ आणि २६ नोव्हेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला असून या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच मुंबईत पावसाचा अंदाज असल्याने हवा गुणवत्ता पातळी चांगली होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता तर उत्तर महाराष्ट्रात देखील विजांच्या गडगडाटासह पाऊस असेल. सोबतच, उत्तर महाराष्ट्रात अगदी तुरळक ठिकाणी गारा पडण्याची देखील शक्यता वर्तविण्यात आली आहे. रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांचा पुन्हा अवकाळीशी सामना होणार आहे. Chance of rain in the state from today

रत्नागिरी जिल्ह्याला उद्यापासून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्याला 24 ते 26  नोव्हेंबर पर्यंत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. एकंदरीतच बदलत्या वातावरणाचा परिणाम हा आंबा पिकावर होण्याची शक्यता आहे. Chance of rain in the state from today

स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, तामिळनाडू किनारपट्टीवर पाऊस पाडणारा पूर्वेकडील कुंड पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत आहे. लवकरच केरळ आणि लगतच्या भागात पोहोचेल. दरम्यान, मुंबईत 25 ते 26 नोव्हेंबर दरम्यान काही प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की, २४ नोव्हेंबरलाही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी संपूर्ण शहरात चांगला पाऊस पडू शकतो, 27 नोव्हेंबर रोजी पावसात घट होईल. Chance of rain in the state from today

Tags: Chance of rain in the state from todayGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarRainटॉप न्युजताज्या बातम्यापाऊसमराठी बातम्यालोकल न्युज
Share70SendTweet44
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.