गुहागर खारवी समाज समितीतर्फे; जिंदाल बंदराच्या चॅनेलमध्ये
गुहागर, ता. 26 : गुहागर तालुका खारवी समाज समिती यांच्यावतीने मच्छीमार नौकेच्या दुर्घटनेबाबत न्याय मिळण्यासाठी जिंदाल जयगड फोर्ट बंदरावर उद्या (२७ एप्रिल) पासून साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे. सदरचे उपोषण हे २७ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० वाजल्यापासून जेएसडब्ल्यू पोर्टच्या चॅनेल मध्ये सुरू होईल व जोपर्यंत निष्पाप जीवांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सदरचे साखळी उपोषण चालू राहील असे या निवेदनात म्हटले आहे. Chain fast by Kharvi Samaj Samiti

जयगड बंदरातून मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या नावेद २ या नौकेला जे. एस. डब्ल्यू. उद्योग समूहाकडे ये – जा करणाऱ्या जे. एस. डब्ल्यूच्या मालवाहू जहाजाने टक्कर देऊन नावेद २ ला जलसमाधी दिली. त्यामध्ये गुहागर तालुक्यातील सात खलाशी मृत्यू झाले. सर्वस्वी घटना जेएसडब्ल्यूच्या अखत्यारीत झाल्याने जे. एस. डब्ल्यू. वर जबाबदारी निश्चित केल्याने मंत्री ना. उदय सामंत यांनी तात्काळ घटनेचे पाहणी करून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक लाखाची तातडीची मदत देण्यास सांगितले. ही मदत मिळाली. परंतु, त्यानंतर कंपनीने मृत झालेल्या खलाशांच्या कुटुंबाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. Chain fast by Kharvi Samaj Samiti
त्यानंतर खारवी समाज समिती गुहागरच्या वतीने सदर विषयावर बैठका झाल्या. परंतु कंपनीने उडवाउडवीची उत्तरे देऊ केली. सदरची घटना जरी न्यायप्रविष्ट असली तरी त्या ७ खलाशांचे मृतदेह न मिळाल्याने कायदेशीर बाबींना अडचणी येत आहेत. त्याकडे कंपनी दुर्लक्ष करत आहे. सदरचा अपघात झाल्यानंतर कंपनीने ना मृतांची व नौकेची शोध मोहिमेसाठी व मयत बॉडीचे अवशेष काढण्यासाठी स्कुबा ड्रायव्हिंगसाठी सहकार्य केले नाही. या कामी फक्त मच्छीमारानी सहकार्य केलेला आहे. Chain fast by Kharvi Samaj Samiti

खारवी समाज समितीने पहिले निवेदन दिल्यानंतर कंपनीने दोन वेळा चर्चेसाठी बोलावले असता मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २० लाख व नौका धारकाला २० लाख अशी मदत करावी व कायदेशीर बाबी संपल्यानंतर जे काय नियमाने असेल ते त्यांना द्यावे अशी मागणी केली होती. परंतु कंपनीने फक्त दोन ते तीन लाखापर्यंत मदत करण्यास संमती दर्शवली होती. परंतु सदरची घटना पाहता त्या मृतदेहांची व त्याच्या नातेवाईकांची केलेली ही क्रूर चेष्टा आहे. आम्हाला आशा होती की कंपनी याच्यावर योग्य प्रकारे तोडगा काढून मृतांच्या नातेवाईकांना मदत करतील, परंतु कंपनीच्या हेकेखोरपणा मुळे सदर मृतांना न्याय मिळत नाही. याची चीड येऊन माणुसकीवर घाला घालणाऱ्याची सुद्धा गैय केली जाणार नाही, असा निर्णय बैठकीत अंती संपूर्ण खारवी समाजाने घेतला व प्रत्येक संस्थेला पत्र तयार करून साखळी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. Chain fast by Kharvi Samaj Samiti
सदरचे उपोषण हे २७ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० वाजल्यापासून जेएसडब्ल्यू पोर्टच्या चॅनेल मध्ये सुरू होईल व जोपर्यंत निष्पाप जीवांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सदरचे साखळी उपोषण चालू राहील असे या निवेदनात म्हटले आहे. Chain fast by Kharvi Samaj Samiti
