• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 August 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे महाविद्यालयात सर्टिफिकेट कोर्सचे उदघाटन

by Guhagar News
July 31, 2025
in Guhagar
156 2
0
Certificate course at Patpanhale College
307
SHARES
877
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आधुनिक युगात कौशल्यावर आधारित शिक्षणाची अधिक गरज; पी ए देसाई

गुहागर, ता. 31 : तालुक्यातील पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन बँकिंग फायनान्स अँड इन्शुरन्स या कौशल्यावर आधारित असणाऱ्या सर्टिफिकेट कोर्सचे उदघाटन प्राचार्य डॉ. पी ए देसाई यांच्या शुभहस्ते करण्यात आले. Certificate course at Patpanhale College

Certificate course at Patpanhale College

यावेळी त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये आधुनिक  युगामध्ये कौशल्याला कसे महत्त्व आहे हे विविध उदाहरणाच्या आधारे स्पष्ट केले आणि वैयक्तिक व व्यावसायिक जीवनामध्ये ही कौशल्य कशाप्रकारे उपयोगी पडतात याची माहिती दिली. यावेळी बजाज फिन्सर्व कंपनीचे राष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षक श्री. अमोघ गोटस्कर  उपस्थित होते.  विद्यार्थ्यांना पारंपारिक शिक्षणाबरोबरच विविध कौशल्य येणे आवश्यक आहे त्या हेतूने पाटपन्हाळे महाविद्यालयतर्फे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम साजरे केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयाने बजाज फिन्सर्व कंपनीबरोबर एक सामंजस्य करार केलेला आहे. या कराराच्या माध्यमातून 140 तासांचा हा कोर्स सुरू करण्यात आला आहे.  Certificate course at Patpanhale College

बजाज कंपनीकडून या कोर्सच्या अभ्यास क्रमाची रचना तयार करण्यात आली आहे. यामध्ये बजाज फिन्सर्व या कंपनीतर्फे अमोघ घोटसकर (मुंबई) नरहर देशपांडे (ठाणे) आणि ज्ञानेश वैद्य (सांगली) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कोर्समुळे विद्यार्थ्यांच्या बँकिंग आणि विमा क्षेत्राशी संबंधित कौशल्यामध्ये वाढ होण्यासाठी मदत होणार आहे.  Certificate course at Patpanhale College

हा कोर्स संपल्यानंतर बजाज फिन्सर्व  कंपनीकडून यशस्वी विद्यार्थ्यांना नोकरीच्या अनुषंगाने प्लेसमेंटची सुविधा देखील दिली जाणार आहे. महाविद्यालयातील एकूण 52 विद्यार्थ्यांनी या कोर्समध्ये सहभाग नोंदवला आहे. या कोर्ससाठी समन्वयक म्हणून वाणिज्य विभाग प्रमुख प्रा  डॉ. एस एस खोत यांची तसेच विद्यार्थी समन्वयक म्हणून विद्या विचारे आणि निखिल टाणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ. पी एस भागवत, प्रा. सुभाष घडशी सर आणि प्रा. कांचन कदम मॅडम उपस्थित होते. Certificate course at Patpanhale College

Tags: Certificate course at Patpanhale CollegeGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share123SendTweet77
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.