गुहागर, दि.15 : शासनाने मोठ्या विश्वासाने शाळा व्यवस्थापन समिती वर शाळेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवलेली आहे. या समितीचे प्रशिक्षण, सक्षमीकरण झाले तर शाळेची गुणवत्ता निश्चित वाढेल. असे प्रतिपादन पं.स. सदस्य सौ. स्मिता धामणस्कर (Smita Dhamanaskar) यांनी केले. त्या वेलदुर नवानगर मराठी शाळेत झालेल्या केंद्र स्तरावरील शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण शिबिरात बोलत होत्या. Center Level Training at Veldur School


जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदुर नवानगर मराठी शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण केंद्र स्तरीय प्रशिक्षण केंद्रप्रमुख अशोक गावणकर (Center Chief Ashok Gavankar) यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालक कल्याण समिती सभापती व पं.स. सदस्य सौ स्मिता ताई धामणस्कर यांच्या शुभहस्ते झाले. स्मिताताई धामणस्कर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी सरस्वती देवी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. Center Level Training at Veldur School
तज्ञ मार्गदर्शक आंधळे सर व जगदाळे मॅडम यांनी शाळा व्यवस्थापन समितीची जबाबदारी, शाळा व्यवस्थापन समितीची रचना व कार्य, शाळा व्यवस्थापन समिती चे आर्थिक नियोजन, कार्यवाही, निर्णय प्रक्रिया, अभिलेखे याविषयी मार्गदर्शन केले. Center Level Training at Veldur School
माननीय स्मिताताई धामणस्कर मार्गदर्शन करताना म्हणाल्या की,, शाळा व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण झाल्याने शाळेचा कायापालट होतो, शाळेमध्ये विविध उपक्रम राबविण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे योगदान बहुमोलाचे असते. शासनाने मोठ्या विश्वासाने शाळा व्यवस्थापन समिती वर शाळेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवलेली आहे. शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्याने शाळा गुणवत्ता क्षेत्रांमध्ये अग्रेसर राहू शकते. केंद्रप्रमुख श्री अशोक गावणकर साहेब यांनी शाळेच्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच प्रगतीपर वाटचालीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. शाळा व्यवस्थापन समिती च्या सहकार्याने शाळेचे अंतरंग व बहिरंग बदलू शकते. शाळेचा कायापालट होण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीतील सर्व पदाधिकारी यांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे. Center Level Training at Veldur School
मानसी जोशी व शंकर कोलथरकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ दिव्या दाभोळकर, शिक्षण तज्ञ शंकरजी कोलथरकर ,सामाजिक कार्यकर्ते देवराम जी भोसले, आंतरराष्ट्रीय शाळा अंजनवेल नंबर 2, अंजनवेल उर्दू, वेलदुर नंबर एक, वेलदूर घरतवाडी ,रानवी, नवानगर, नवानगर उर्दू ,वेलदुर उर्दू,. अंजनवेल हायस्कूल या शाळांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. Center Level Training at Veldur School
तसेच सचिन घाणेकर, वैभवी जाभारकर ,राजेश जावळे, नदीम काकडे, शाहीन डबीर, चेतना जाभारकर, सुषमा रोहीलकर, सुवर्णा कोलथरकर, विशाखा नाटेकर, सानिया वनकर, स्मिता जाभारकर, शशिकला आडेकर, मुख्याध्यापक मनोज पाटील ,गणेश विचारे ,मानसी जोशी ,मुजीब सर, नदीम कोतवडेकर,. अण्णासाहेब शिंदे, तज्ञ मार्गदर्शक महेश आंधळे, सत्वशीला जगदाळे, कुपे सर आदी मान्यवर उपस्थित होते. आभार प्रदर्शन अण्णासाहेब शिंदे यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मनोज पाटील सर यांनी केले. Center Level Training at Veldur School

