गुहागर, ता. 10 : महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार चिखली येथे “वंदे मातरम्” गीताच्या शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी गुहागर तालुक्याचे तहसिलदार तथा समिती अध्यक्ष श्री. परिक्षीत पाटील व पोलीस निरीक्षक श्री. सचिन सावंत यांनी आवर्जून उपस्थित होते. गुहागर तालुक्यातील जमलेल्या सहस्र युवक युवती व नागरिकां मध्ये वंदे मातरम् संपूर्ण गीत गायनाने भारतमातेचा गुणगौरवाने देशभक्ती जागरूक करून व भाषणातून चैतन्य निर्माण केले. या गीताने संपूर्ण विविधतेने नटलेला निरनिराळ्या परंपरेचा आपला स्वातंत्र पूर्व भारत देश एक झाला असे सांगितले. Centenary celebration of the song ‘Vande Mataram’
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. अक्षय पवार, गोपाळ गड संवर्धन समिती यांनी वन्दे मातरम् राष्ट्रीय गीताला 7 नोव्हेंबर 2025 रोजी 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल बंकिमचंद्र चटोपाध्याय यांचा या गीत लेखनाचा उद्देश काय होता त्याचे रूपांतरण देश स्वतंत्र होण्यासाठी कसा झाला याचे महत्व सांगितले. तर गुहागर तालुक्यात जन्मलेल्या डॉक्टर योगिता खाडे यांचा अनेक अडचणी वर मात करून आंतरराष्ट्रीय क्रिडापटू पर्यंतचा प्रवासाचा जीवनपट व परदेशात मेडल जिंकल्यानंतर परकीय भूमीत भारताचा ध्वज घेऊन वंदे मातरम् गर्जना करताना शहारे येतात असे सांगून देशभक्ती जागृत केली. आयटीआय चे शिल्प निदेशक श्री. प्रदीप घस्ती, श्री. भूपेंद्र पवार व प्रशिक्षणार्थ्यांनी सादर केलेल्या सर्वधर्म समभाव देशभक्ती लघुनाटिका लक्षणीय होती. Centenary celebration of the song ‘Vande Mataram’

या कार्यक्रमासाठी समिती सदस्य गट विकास अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी श्री.प्रतिक जाधव, गट शिक्षणाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी श्री. विलास शेंबेकर, न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी मुख्याध्यापिका श्रीमती संपदा चव्हाण, व्यवसाय शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी श्री. वृणाल बेर्डे, साहित्यिक खरेढेरे भोसले सिनिअर कॉलेज श्री. विराज महाजन, उद्योजक श्री. प्रसाद वैद्य, हभप गोविंद साळवी बुवा, आयएमसी सदस्य श्री. अमित मोरे, महिला बचत गट प्रमुख श्रीमती दुर्वा ओक, अपंग पुनर्वसन संस्था गुहागर श्री. उदय रावणंग , ग्रामाधार स्वयंसेवी संस्था गुहागर श्री.अजिंक्य पेडणेकर, सरपंच ग्रामपंचायत चिखली श्रीमती मानसी कदम, सरपंच ग्रामपंचायत जाणवळे श्रीमती जान्हवी विखारे, पत्रकार श्री. मनोज बावधनकर उपस्थित होते. Centenary celebration of the song ‘Vande Mataram’
या कार्यक्रमासाठी लक्षणीय सहकार्य व उपस्थिती पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी पाटपन्हाळे, न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे शाळेचे विद्यार्थी व रिगल टेक्निकल प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षणार्थी होते. त्याचे शिस्तबद्ध नियोजन शाळेचे पर्यवेक्षक प्रा.श्री. संजिव मोरे सर यांनी केले. समितीचे सदस्य प्राचार्य औ.प्र.संस्था गुहागर श्री.प्रितम शेट्ये यांचे योग्य मार्गदर्शन लाभले. व आयटीआय स्टाफ, गट निदेशक श्री.गुरखे पी.डी., श्री.गोरे ए . एन., व शिल्प निदेशक, श्री. चंद्रशेखर शेंडे, श्री.राजेंद्र मानकर, श्री.विशाल काटकर , श्री.मनोज निजवे, श्री.अनंत चव्हाण, श्री. दिपक जाधव, श्री.इंद्रजीत भोसले, श्री.विठ्ठल मैंद , श्री.शुभम गेडाम, श्री.वकास बरमारे, सौ.शिल्पा भोसले, श्रीमती रोहिणी सुतार, श्रीमती अवंतिका भुवड, श्री.दिपक धनावडे, भांडारपाल श्री. संदिप नांदगावकर, वरिष्ठ लिपीक श्रीमती ऋतुजा घाग, सहाय्यक कर्मचारी श्री.सतीश बाल्मीकी, श्री.मोहन कांबळे, श्री.प्रशांत रेवाळे यांनी कार्यक्रमाचे मेहनतीने नियोजन केले. सूत्रसंचालन शिल्पनिदेशक श्री. संजय पालकर यांनी केले. तर सौ.समीक्षा धामणस्कर यांनी उपस्थितांचे आभार मानले. Centenary celebration of the song ‘Vande Mataram’
