गुहागर, ता.16 : अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनी चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन बाईत यांच्या हस्ते व अनंत गीते कौशल्य विकास संस्था आबलोली गोणबरेवाडी येथे लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत बाईत यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय…., वंदे मातरम् अशा घोषणा दिल्या. Celebrating Independence Day in Aabaloli

यावेळी माजी सरपंच गजानन धोंडू उर्फ अण्णा बाईत यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. गजानन बाईत हे आबलोली ग्रामपंचयतीचे सलग गेली 26 वर्ष सरपंच राहिले आहेत. पहिले तंटामुक्ती अध्यक्ष होण्याचा मान देखील त्यांना मिळाला होता. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी हस्ते गावातील सर्व प्राथमिक शाळा, एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल याठिकाणी चॉकलेट वाटप करण्यात आले. Celebrating Independence Day in Aabaloli

यावेळी चंद्रकला फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष सचिन बाईत, मुख्याध्यापिका सौ. नेत्रा नरेंद्र रहाटे, कु. शुभम बाईत, रजत बाईत, श्री. पवार, सौ. एस.आर. मुल्ला, सौ. एस.एस. साळुंखे, सौ. पी. एस. शिगवण, सौ. एस.आर. ईटवले, सौ. एस.डी. निवाते, कु. ए. ए रेपाळ, कु. मृन्मयी साळुंखे आदिंसह विद्यार्थी उपस्थित होते. Celebrating Independence Day in Aabaloli

