गुहागर, दि.11 : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी (Ratnagiri of CA Institute) शाखेतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून मथुरा हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला डॉ. जाखड उपस्थित होत्या. या वेळी त्यांचा सत्कार शाखेचे अध्यक्ष सीए प्रसाद आचरेकर आणि विकास चेअरमन सीए अभिलाषा मुळ्ये यांनी केला. व्यासपीठावर उपाध्यक्ष सीए मुकुंद मराठे उपस्थित होते. सूत्रसंचालन सी. ए. मोनाली कुलकर्णी यांनी केले. Celebrate Women’s Day in Ratnagiri


सीए हे क्षेत्र देशासाठी खूपच महत्त्वाचे आहे. या क्षेत्रात महिलांनीही योगदान दिले आहे. रत्नागिरीतील महिला, विद्यार्थिनी याक्षेत्राकडे वळत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना लेखापरीक्षण माहिती असते. पण आता परफॉर्मन्स ऑडिटही सुरू केले आहे. सीए होणे ही खूपच कठीण गोष्ट आहे. सीएंमुळे सर्व गोष्टीत सुसूत्रीकरण येते, असे प्रतिपादन जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी केले. Celebrate Women’s Day in Ratnagiri


याप्रसंगी डॉ. जाखड म्हणाल्या की, मी सर्व महिला सीएंचे अभिनंदन करते. आज महिला दिनाच्या विविध कार्यक्रमांतून रत्नागिरीच्या बाबतीत बरीच माहिती मिळाली. रत्नागिरीत महिला वकिल, सीएंची संख्या लक्षणीय आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. सीए परीक्षा खूपच कठीण आहेत. मला अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्राची माहिती होती. पण सीए होणे म्हणजे खूप कठीण आहे. यामध्ये मुलींना भरपूर संधी आहेत. विद्यार्थींनींनी या क्षेत्रात आवर्जून यावे. मला फायनान्शियल ऑडिट माहिती आहे. आता शासनातर्फे परफॉर्मन्स ऑडिटही सुरू केले आहे. ऑडिट म्हणजे वैद्यकीय भाषेत एक प्रकारचे विच्छेदन आहे. हे काम कंटाळवाणे वाटेलही, पण ते लक्षणीय आहे. चांगले काम केले तरच सुसूत्रीकरण येते. आर्थिक गोष्ट सीएंवर अवलंबून आहेत. आयटीआर व्यवस्थित असला तर तुमचे रोल महत्त्वाचे आहे. Celebrate Women’s Day in Ratnagiri
या वेळी रत्नागिरीतील महिला सीएंचा सन्मान डॉ. जाखड यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये सीए अभिलाषा मुळ्ये, सीए अनुष्का हळबे, सीए अमृता बेर्डे, सीए मीनल काळे, सीए मोनाली कुलकर्णी, सीए नयन सुर्वे, सीए धनश्री करमरकर, सीए आयेशा आघाडी, सीए मयुरी भुवड यांचा समावेश होता. कार्यक्रमाला कार्यवाह सीए अक्षय जोशी, खजिनदार सीए केदार करंबेळकर, सदस्य सीए शैलेश हळबे यांच्यासमवेत रत्नागिरीतील सीए, सीएचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. Celebrate Women’s Day in Ratnagiri

