• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सण-उत्सव शांततेत पार पाडा

by Manoj Bavdhankar
April 26, 2022
in Maharashtra
16 0
0
Celebrate the festival in peace
32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पोलीस अधीक्षक गर्ग; जातीय सलोखा कायम ठेवा

गुहागर, ता. 26 : आगामी रमजान ईद व अक्षय तृतीया या सण/उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत डाँ. मोहित कुमार गर्ग, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 24/04/2022 रोजी चिपळूण व खेड पोलीस स्टेशन येथे तसेच दिनांक 25/04/2022 रोजी मंडणगड पोलीस स्टेशन येथे शांतता समिती सदस्य, सर्व धर्मातील प्रतिष्ठीत नागरिक, महिला दक्षता समीती सदस्य, ग्राम रक्षक दल सदस्य,  पोलीस पाटील यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. Celebrate the festival in peace

सदर बैठकीमध्ये मा.पोलीस अधीक्षक यांनी उपस्थितांकडून ते काम करत असलेल्या समितीमधील कामकाजाचा आढावा घेतला व काम करत असताना त्यांना उद्भवणा-या अडी – अडचणींबाबतही सविस्तर माहिती घेतली. तसेच उपस्थितांकडून आगामी सण-उत्सवांच्या अनुषंगाने स्थानिक कार्यक्रमांबाबत सविस्तर माहिती घेऊन त्यांना हे सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दलासोबत योग्य तो समन्वय ठेऊन सहकार्य करण्याचे व जातीय सलोखा कायम राखण्याबाबत आवाहन केले. त्याचप्रमाणे या सण व उत्सवांच्या अनुषंगाने शासनाकडून जाहीर केल्या जाणा-या सर्व नियमावलींचे पालन करण्याबाबत सूचित केले. Celebrate the festival in peace

Celebrate the festival in peace

तसेच सध्या मोठ्या प्रमाणावर वाढत असलेल्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर अशा गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा या उद्देशाने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत डाँ. मोहित कुमार गर्ग, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांच्या संकल्पनेतून सर्व स्तरातील नागरिकांच्या जनजागृतीसाठी ‘ एहसास ‘ ( e – Swachhata Abhiyan For Secure Society  ) हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात  राबवण्यात येत आहे. याच उपक्रमाअंतर्गत  यावेळी मा.पोलीस अधीक्षक यांनी उपस्थितांना  सध्या मोठ्या प्रमाणावर वाढत असलेल्या सायबर गुन्ह्यांबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच असे गुन्हे होऊ नयेत यादृष्टीने कोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. इंटरनेटचा तसेच सोशल मिडीयाचा सुरक्षित व योग्य वापर कसा करावा याबाबतही उपयुक्त माहिती  देऊन त्यांच्या या संदर्भातील अडी-अडचणी समजाऊन घेतल्या व त्यांचे निरसन केले. Celebrate the festival in peace

Tags: Celebrate the festival in peaceGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.