कै. सौ. नीला व मधुकाका परचुरे यांच्या स्मृतीप्रीतर्थ परचुरे परिवार व कॅरम प्रेमी मित्र मंडळ गुहागरतर्फे आयोजन
गुहागर, ता. 07 : कै. सौ. नीला व कै. श्री मधुकाका परचुरे यांच्या स्मृतीप्रीतर्थ परचुरे परिवार व कॅरम प्रेमी मित्र मंडळ गुहागरतर्फे या वर्षातील १० वी महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहॆ. या स्पर्धा रत्नागिरी जिल्हा कँरम असोसिएशनच्या सहकार्याने व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने कै. इंदिरा वासुदेव शेटे सभागृह (भंडारी भवन) गुहागर येथे उद्या दिनांक ८ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पुरुष एकेरी व महिला एकेरी या गटात होणार आहेत. Carrom competition at Guhagar

स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचा लोगो असलेला सफेद टी शर्ट परिधान करणे आवश्यक आहे. या स्पर्धेत विजेताना रुपये एक लाखाची पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेत जिल्हातील जास्तीत जास्त खेळाडूंनी भाग घ्यावा, असे आवाहन स्पर्धा आयोजक श्री. प्रदीप परचुरे व कॅरम प्रेमी मित्र मंडळ गुहागर, श्री सुचय अण्णा रेडीज ( सल्लागार, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन ), श्री प्रदीप भाटकर (अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन ), श्री सुरेंद्र देसाई (उपाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन ), श्री नितीन लिमये (खजिनदार, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन ), श्री मिलिंद साप्ते (सेक्रेटरी, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन ) यांनी केले आहे. Carrom competition at Guhagar
