गुहागर, ता. 18 : जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था, महाराष्ट्र, विभाग रत्नागिरी. यांचे माध्यमातून श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, स.सु.पाटील शास्त्र, श्री.म.ज.भोसले वाणिज्य, विष्णुपंत पवार कला कनिष्ट महाविद्यालय गुहागर येथे विद्यार्थ्यांनां समुपदेशन आणि करिअर मार्गदर्शन करण्यात आले. संस्थेचे सचिव श्री.केदार चव्हाण सर तसेच मार्गदर्शक श्री.संदीप पाटील सर, गुहागर तालुका समन्वयक श्री.डिंगणकर, मैदानी प्रशिक्षक श्री.राहूल रेवाळे सर उपस्थित होते. Career guidance for students

गुहागर तालुका भंडारी ज्ञाती बांधव यांचेकडून सदर कार्यक्रमास विनामूल्य सभागृह देण्यात आले. यावेळी भंडारी समाज गुहागर तालुका अध्यक्ष श्री.नवनित ठाकूर, सल्लागार श्री.बागकर तसेच गुहागर तालुक्यात शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत श्री.साहील आरेकर हे उपस्थित होते. Career guidance for students

सदर कार्यक्रमाचे आयोजक म्हणून मुख्याध्यापक श्री.सुधाकर कांबळे सर, उपमुख्याध्यापिका सौ.सुजाता कांबळे मॅडम, पर्यवेक्षक श्री.मधुकर गंगावणे सर, सुत्रसंचालक श्री.निलेश गोयथळे सर यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी उत्तम सहकार्य केले. ह्याच वेळी इयत्ता पाचवी ते सातवी तसेच दहावी ते बारावी वर्गातील विद्यार्थ्यांनां मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. Career guidance for students