रत्नागिरी, ता. 07 : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय (डीजीके) बँकिंग क्षेत्रातील करिअर- मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. यात हेरंब पोंक्षे यांनी मार्गदर्शन केले. Career Guidance at DGK College

बँकिंग क्षेत्रातील परीक्षा, विषयांचा अभ्यास, परीक्षा पद्धती, परीक्षेत येणारे प्रश्न, रोजगाराच्या संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थी या सत्रामध्ये सहभागी झाले. या वेळी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या प्रा. वसुंधरा जाधव, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. राखी साळगावकर, कॉमर्स अँड सोशल फोरमचे प्रमुख प्रा. वैभव कीर उपस्थित होते. सूत्रसंचालन गौरवी ओळकर हिने केले. तन्वी पटवर्धन हिने आभार मानले. Career Guidance at DGK College