• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळेत दुभाजकावर आपटली कार

by Manoj Bavdhankar
May 10, 2023
in Guhagar
253 3
0
Car Accident in Patpanhale

Car Accident in Patpanhale

497
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दगडोबा येथील घटना, वाहनातील सर्वजण सुखरुप

गुहागर, ता. 10 :  तालुक्यातील पाटपन्हाळे येथे महामार्गावरील दगडोबा स्थानाजवळील दुभाजकावर बुधवारी (ता. 10) सकाळी 6.30 च्या दरम्यान चारचाकी वाहन आपटले. अपघाताची तिव्रता मोठी असूनही वाहनांमधील पाचही जण वाचले आहेत. या अपघाताची नोंद गुहागर पोलीस ठाण्यामध्ये वाहन मालक विजय शांताराम दणदणे राहणार मुंबई गोरेगाव यांनी केली आहे. Car Accident in Patpanhale
अपघाताची भिषणता पहाण्यासाठी बातमी खालील व्हिडिओ जरुर पहा.

पोलीस ठाण्यातील नोंदीप्रमाणे विजय दणदणे हे मुंबईहून मंगळवारी (ता. 9) रात्री दहा वाजता आपल्या मालकीची चारचाकी (एम एच 47 एन 0728) घेऊन गुहागर तालुक्यातील अडूर पड्याळवाडीला येण्यासाठी निघाले.  बुधवारी (ता. 10) सकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान गुहागर विजापूर या राष्ट्रीय महामार्गावर शृंगारतळी सोडल्यानंतर पाटपन्हाळे येथील दगडोबा जवळ ते पोचले. येथे महामार्गाचे एक दिशा मार्ग असलेले दोन स्वतंत्र रस्ते आहेत. ते समजण्यासाठी दुभाजक बसविण्यात आले आहेत. याठिकाणी वाहन आले असता समोरुन येणाऱ्या बैलाला वाचवताना विजय दणदणे यांचे वाहन दुभाजकावर आदळले. ही धडक इतकी भिषण होती की दुभाजकाचा पन्हळी पत्रा थेट वाहनात घुसला.  परंतु सुदैवाने वाहनातून प्रवास करणारे विजय दणदणे, राजेश शांताराम दणदणे, सौ विजया विजय दणदणे, प्रज्ञा विजय दणदणे, नाना रूपा हळये असे पाचही जण या अपघातापासून सुखरूप वाचले आहेत. गुहागर पोलीस ठाण्यामध्ये सदर अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार प्रमोद मोहिते करत आहेत.

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.
Tags: Car Accident in PatpanhaleGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share199SendTweet124
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.