नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांना शनिवारी-रविवारीही उमेदवारी अर्ज भरता येणार
मुंबई, ता. 15 : आगामी नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारांना ऑफलाईनसुद्धा नामनिर्देशनपत्र भरण्याची सवलत देण्यात आली आहे. शनिवारी आणि रविवारीही उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. निवडणूक आयोगाचे सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना याबाबत आदेश दिले आहेत. २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या अर्ज भरता येणार आहे. Candidates can fill the application form on holidays.
नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र भरण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. आता इच्छूक उमेदवारांना ऑनलाईनसोबतच ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा नामनिर्देशनपत्र सादर करण्याची सवलत देण्यात आली आहे. त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवारी आणि रविवारी देखील नामनिर्देशनपत्रे स्वीकारले जाणार आहे. याबाबतचे आदेश सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशपत्र भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. Candidates can fill the application form on holidays.

परंतु विविध राजकीय पक्ष आणि इच्छूक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्रे सादर करण्याची सवलत देण्यात यावी, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. या मागणीनंतर त्याबाबत क्षेत्रीय स्तरावर आढावा घेऊन ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा नामनिर्देशनपत्र भरण्याची सवलत देण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. सुट्टीच्या दिवशीही दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येतील. नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला. Candidates can fill the application form on holidays.