दि. १७ ते १९ जून रोजी विनामूल्य व्यवसायाभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
रत्नागिरी, ता. 09 : महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने युथ एड फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभर उद्यमिता यात्रेचे आयोजन केले आहे. दि. १० मे २०२२ रोजी मुंबई येथून या उद्यमिता यात्रेला सुरुवात झाली आहे. दि. १६ जून २०२२ रोजी रत्नागिरी येथे या यात्रेचे आगमन होणार आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शामराव पेजे सभागृहामध्ये जिल्हाधिकारी डॉ. बी.एन पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली या यात्रेचा Launching Event होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या या यात्रेच्या नियोजन आणि अंमलबजावणीची जबाबदारी विकास सहयोग प्रतिष्ठान या संस्थेने स्विकारली आहे. Business oriented training in Ratnagiri
ही उद्यमिता यात्रा राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये जाणार आहे. Launching Event नंतर पुढील ३ दिवस ( दि. १७ ते १९ जून २०२२ रोजी ) रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे १०० नव व्यवसायिकांसाठी चिपळूण पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये अनिवासी स्वरूपाच्या व्यवसायाभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण हे विनामूल्य असून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देखील प्रदान करण्यात येणार आहे. Business oriented training in Ratnagiri
या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र शासनाच्या तज्ञ व्यक्तींचे व्यवसाय नियोजन, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची ओळख करून त्याच्याशी जोडून घेणे, व्यवसायांचे विविध पर्याय सुचविणे, व्यवसायासाठी बाजार संध्या शोधणे आणि जिल्हा उद्यमिता विभागाला जोडून देणे या मुद्यांवर भर दिला जाईल. त्याचबरोबर नव व्यवसायीकांसाठी बीज भांडवलासाठी मदत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून प्रथम नावनोंदणी करणाऱ्या केवळ १०० प्रशिक्षणार्थिंनाच या संधीचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे इच्छुक लाभार्थीनी आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी व अधिक माहितीसाठी विजय कदम ( विभागीय समन्वयक -विकास सहयोग प्रतिष्ठान )यांच्याशी ७५८८९०९०८० / ७६६६९८२४६९ या भ्रमणध्वनीवर दिनांक १३ जून २०२२ पूर्वी संपर्क करावा असे आवाहन करणायत येत आहे. Business oriented training in Ratnagiri
सन २०२० मध्ये सारे जग कोरोनाने होरपळून निघाले होते. कोरोना महामारीचा फटका सर्वच क्षेत्राला बसला होता. देशाची सारी अर्थव्यवस्था डबघाईला आली होती.अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, लघु आणि मध्यम व्यवसाय बंद पडले. आता कोरोनाचा प्रभाव थोडा थोडा कमी व्हायला लागला आहे. म्हणूनच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीने राज्यातील लघु व्यवसाय सुरु करण्याची ईच्छा असणाऱ्यांना मदत आणि मार्गदर्शन करण्याचे कार्य हाती घेतले आहे. महाराष्ट्र शासनाच्या या कार्यात राज्य स्तरावर राज्यातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने युथ एड फाउंडेशनने याकामी पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने युथ एड फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभर उद्यमिता यात्रेचे आयोजन केले आहे. Business oriented training in Ratnagiri
