विधानसभेत गोंधळ; सत्ताधार्यांकडून राज्यपालांविरोधात घोषणाबाजी
गुहागर, दि. 03 : महाराष्ट्राच्या विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. यावेळी राज्यपाल आपलं अभिभाषण करत असतात. त्यांच्या भाषणानंतर कामकाजाला सुरुवात होत असते. मात्र, विधी मंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा राज्यपाल भाषण सोडून गेल्याची घटना घडली आहे. Budget Session Maharashtra Assembly
त्यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याबरोबर सत्ताधाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या नावाची घोषणाबाजी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपनेही (BJP) मग ‘नवाब मलिक हाय हाय’च्या घोषणा दिल्या. राज्यपालांच्या या भाषणावेळीच मोठा गोंधळ झालेला पहायला मिळाला. या गोंधळामुळे राज्यपालांनी आपलं भाषण अर्ध्यावरच थांबवलं आणि ते निघून गेले (Budget Session Maharashtra Assembly)
विशेष म्हणजे राष्ट्रगीत न होताच राज्यपाल निघून गेले आहेत. सभागृहातील घोषणाबाजीमुळे राज्यपालांनी भाषण गुंडाळलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई आणि जोतिबा फुलेंचा (Chhatrapati Shivaji Maharaj, Savitribai Phule, Jyotiba Phule) अपमान केल्याचा ठपका ठेवत राज्यपालांविरोधात सत्ताधारी पक्ष विधीमंडळात आक्रमक झाल्याचं दिसून आलं. पायऱ्यांवर सत्ताधार्यांकडून राज्यपालांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच ‘राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव’ अशा घोषणाही देण्यात आल्या. Budget Session Maharashtra Assembly
या प्रकरणावर आपली भूमिका मांडताना काँग्रेसचे (Congress) नेते नाना पटोले यांनी म्हटलंय की, शिवरायांच्या उल्लेख एकेरी केल्याबद्दल त्यांना माफी मागावी लागेल. अशा पद्धतीची भूमिका घेऊन तसा कायदेशीर प्रस्तावही आणला जाणार आहे. या प्रकारे छत्रपतींचा अपमान आणि फुले दांपत्याबाबतचे आक्षेपार्ह वर्तन राज्यपालांना शोभेसं नाहीये. त्याबाबत भाजपनेही आपली भूमिका स्पष्ट करावी. Budget Session Maharashtra Assembly
– घटनाक्रम –
- राज्यपाल आल्यावरच घोषणाबाजी सुरु. राष्ट्रगीत होऊ द्या, अशी विनंती केली.
- राष्ट्रगीतानंतर भाषणाला सुरुवात, शिवाजी महाराजांचा उल्लेख केला तेंव्हा ‘शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणाबाजी सुरु झाली.
- मुख्यमंत्र्यांनी हात वर करुन घोषणा थांबवण्याची विनंती केली.
- त्यानंतर मग ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणा देण्यात आल्या.
- भाजप आमदार राम सातपुतेंनी फलक दाखवलं. ‘नवाब मलिक हा दाऊद साथीदार’
- नवाब मलिकांविरोधात घोषणाबाजी सुरू झाली.
- राज्यपालांनी या गोंधळातच भाषण उरकलं आणि फाईल बंद करून निघून गेले.
- त्यांच्या अनुपस्थितीच राष्ट्रगीत झाले.