प्री-नॅशनलसाठी निवड, राज्याचे प्रतिनिधित्व करणार
गुहागर, ता. 31 : वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत रत्नागिरी येथील देवळेकर भगिनींनी पुणे बालेवाडी येथे महाराष्ट्र रायफल संघटनेने आयोजित केलेल्या २८ व्या कॅप्टन इजिकल शूटिंग चॅम्पियनशिप शॉटगन स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी करत यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाचे सर्वस्थरातून कौतुक होतं आहे. दोघींचीही प्री-नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्या आगामी काळात महाराष्ट्र रायफल संघटनेचे प्रतिनिधित्व करणार आहेत. Brilliant performance in shooting competition

२६ ते २८ जुलै दरम्यान पुणे येथे झालेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत वरा मानस देवळेकर हिने ज्युनियर डबल ट्रॅप शूटिंगमध्ये रौप्यपदकाची कमाई केली, तर तिची बहीण कार्तिकी मानस देवळेकर हिने कांस्यपदक जिंकून आपले कौशल्य सिद्ध केले. याच स्पर्धेत मैत्री मनोज साळवी हिनेही उत्तेजनार्थ क्रमांक मिळवत आपले नाव चमकवले. या तिन्ही गुणवान नेमबाजांची प्री-नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. Brilliant performance in shooting competition
या तिघींनाही बालेवाडी रेंजचे प्रशिक्षक सिद्धार्थ पवार यांनी प्रशिक्षण दिले. तसेच त्यांना हेमंत बालवडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सिद्धांत रायफल क्लबचे अध्यक्ष विजय खारकर, सचिव आणि राष्ट्रीय नेमबाज किसन खारके, सदस्य अलंकार कोळी आणि प्रसिद्ध उद्योजक सौरभ मलुष्टे यांनी या तिघींच्याही नेत्रदीपक कामगिरीचे कौतुक केले आहे. या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. Brilliant performance in shooting competition

कार्तिकी इयत्ता नववी, तर वरा इयत्ता आठवी मध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूल, रत्नागिरी येथे शिक्षण घेत आहेत. वडील मानस सुरेंद्र देवळेकर हे नेमबाजीतील राष्ट्रीय खेळाडू आहेत. ते 2017 पासून रायफल या खेळ प्रकारात खेळत आहेत. 2021, 2023, 2024 या वर्षात त्यांनी 22 प्रोन या खेळ प्रकारात राष्ट्रीय प्रख्यात नेमबाज किताब पटकावला आहे. तसेच शॉटगन ट्रॅप या खेळात 2022 व 2023 मध्ये राष्ट्रीय खेळात सहभाग घेतला होता. त्यांच्या दोन्ही मुलींना या खेळाविषयी आवड निर्माण झाली. आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नेमबाजीतील श्री गणेशा गिरवला. आज त्यांना त्यांचे मार्गदर्शक प्रशिक्षक शिकवत असले तरी आमच्या या यशात वडिलांचाही हातभार असल्याचे त्या आवर्जून सांगतात. Brilliant performance in shooting competition