• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 December 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

क्षत्रिय मराठा मंडळाचा वधू- वर परिचय मेळावा

by Guhagar News
December 12, 2025
in Ratnagiri
59 1
1
Bride and groom introduction meeting
117
SHARES
333
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp


रत्नागिरी, ता. 12 : रत्नागिरी येथील क्षत्रिय मराठा मंडळ आयोजित वधू वर परिचय मेळाव्याला टीआरपी येथील अंबर हॉल येथे २५० वधू- वर व त्यांचे पालक उपस्थित होते. या वेळी मंडळाच्या मराठा सप्तपदी या वेबसाईटचे अनावरण वधुवर समिती प्रमुख संध्या मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. Bride and groom introduction meeting

Bride and groom introduction meeting

मंडळाच्या www.marathasaptapadi.com या वेबसाईटवर नवीन नोंदणी करू शकणार आहोत. सदर वेबसाईट वरती मंडळाकडे चालू वर्षी नोंदणी केलेले जवळपास १२५ वधू- वर यांचे प्रोफाइल्स अपलोड करण्यात आले आहेत. नोंदणीकृत प्रोफाइल्सचे यूजर आयडी व पासवर्ड संबंधित उपवर वधू वर यांना देण्यात आले आहेत. मेळाव्यात नव्याने नोंदणी झालेल्या सर्व वधूवर यांचे प्रोफाइल मंडळाकडून 17 डिसेंबरपर्यंत अपलोड केले जाणार आहेत. यापूर्वी नोंदणी केलेल्या वधू वर यांचे प्रोफाइल 27 डिसेंबरपर्यंत मंडळाकडून अपलोड केले जाणार आहेत. अपलोड केलेल्या वधु वर यांच्या प्रोफाईल चे यूजर आयडी व पासवर्ड संबंधित वधूवरांना व्हाट्सअप द्वारे पोहोच केले जाणार आहेत. वेबसाईट नवीन नोंदणीसाठी खुली करण्यात आली आहे. 7 जानेवारीपर्यंत जे वधू- वर या वेबसाईटवर आपले प्रोफाइल अपलोड करतील त्यांच्यासाठी फक्त 499 एवढे माफक शुल्क आकारण्यात येणार आहे. Bride and groom introduction meeting

मेळाव्यामध्ये मंडळाच्या उपाध्यक्ष प्राची शिंदे यांनी प्रास्ताविक केले. संतोष तावडे यांनी वेबसाईट व मराठा बिझनेसमन फोरमची माहिती सांगितली. अमित कदम यांनी सूत्रसंचलन केले. सचिव योगेश साळवी यांनी मेळाव्याला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल आभार मानले. Bride and groom introduction meeting

Tags: Bride and groom introduction meetingGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share47SendTweet29
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.