गुहागर, ता. 07 : तालुक्यातील श्रीं देवी व्याघ्राबरी सेवा सहकारी मंडळ आरे यांच्यावतीने खुला गट बॉक्स अंडर आर्म स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक दत्त प्रासादिक कुडली तर द्वितीय क्रमांक हनुमान कुडली यांनी पटकावला. यांना रोख रक्कम आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत बुरोंडी, दाभोळ, नवानगर, वोणी भाटी, बाग, वरचापाट, कीर्तनवाड़ी, खालचापट, कुडली, पालशेत, कारुळ, वेळणेश्वर येथील संघ सहभागी झाले होते. Box Under Arm Cricket Tournament at Aare
या स्पर्धेचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष विशेषजी घड़वले, सामाजिक कार्यकर्ते सुरेश दादा सावंत, साहिलजी आरेकर, संदीप देवकर, श्रीधर बागकर, चंद्रकांत भोसले, जयप्रकाश बोले, अरुण भोसले, श्री देवी वाघ्रांबरी मंदिर देवस्थान अध्यक्ष श्रीकांत महाजन यांचे हस्ते करण्यात आले. या दोन दिवस खेळविण्यात आलेल्या स्पर्धेसाठी गावातील जेष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. Box Under Arm Cricket Tournament at Aare

या स्पर्धेतील प्रथम क्रमांक दत्त प्रासादिक कुडली यांना रोख रक्कम रु.11111 आणि आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक हनुमान कुडली यांना रोख रक्कम रु.7777. आणि आकर्षक चषक तसेच मालिकावीर – श्रेयश फनसकर, सर्वोकृष्ट फलंदाज- रोहन पावारी, सर्वोकृष्ट गोलांदाज -वृषभ पावारी, सर्वोकृष्ट क्षेत्ररक्षक – मिनेश हरसकर यांना बक्षिस देवून गौरवीण्यात आले. Box Under Arm Cricket Tournament at Aare
स्पर्धेची बक्षीसे आरे गावचे सुपुत्र नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख श्री संजय रमेश भोसले यांस कडून प्रथम क्रमांक व आकर्षक चषक, श्री संजय रमेश भोसले यांस कडूनद्वितीय पारितोषिक, श्री अभिषेक बेटकर मुंबई उर्फ बबन यांस कडून स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू , श्री संदीप आत्माराम भोसले यांस कडून सर्वोत्कृष्ट फलंदाज, श्री समीर धोंडो भोसले यांस कडून स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, श्री स्वप्निल रमेश भोसले यांस कडून स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ही बक्षिसे देण्यात आली. Box Under Arm Cricket Tournament at Aare

स्पर्धाचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुणे शिवसेना शाखा प्रमुख श्री. संजयजी भोसले तसेच कार्तिकजी कळझुनकर, दिपक कगुटकर, निलेश मोरे, समित घाणेकर, अमरदीप परचूरे व इतर गावातील सर्व नागरिक उपस्थित होते. स्पर्धाचे सूत्र संचालन दिपक देवकर, सुयोग आरेकर, अमोल नरवणकर यांनी केले व पंच म्हणून अविनाश झींबर यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. Box Under Arm Cricket Tournament at Aare