• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

नवानगर शाळेत शंभर दिवस वाचन उपक्रम

by Guhagar News
May 4, 2022
in Guhagar
16 0
0
Book fair organized at Nawanagar school
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

भव्य पुस्तक मेळाव्याचे आयोजन

गुहागर, ता. 03 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक वेलदुर नवानगर मराठी शाळेमध्ये शंभर दिवस वाचन उपक्रमाअंतर्गत भव्य पुस्तक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सानिया वनकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. Book fair organized at Nawanagar school

वेलदुर नवानगर मराठी शाळेमध्ये शंभर दिवस वाचन उपक्रम अतिशय नियोजनबद्ध सुरू आहे. शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, सर्व पुस्तकांचा परिचय व्हावा, पुस्तकांशी मैत्री जडावी या उद्देशाने शाळेमध्ये भव्य पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करून विद्यार्थी पालक यांना समृद्ध दालन उपलब्ध करून देण्यात आले. Book fair organized at Nawanagar school

त्यावेळी मुख्याध्यापक मनोज पाटील, रवींद्र जांभारकर, सोनाली वनकर, विशाखा नाटेकर, सुवर्णा कोळथरकर, सत्वशीला जगदाळे, पल्लवी घुले, अंजली मुद्दमवार, निलोफर शेख, मत्स्यगंधा कोलथरकर, सोनिया नाटेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व पालक बहुसंख्येने उपस्थित होते. Book fair organized at Nawanagar school

विद्यार्थ्यानी मनसोक्तपणे वाचनाचा आनंद उपभोगला. पालकांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. त्यावेळी बोलताना मुख्याध्यापक मनोज पाटील म्हणाले की जीवनात वाचनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुस्तकांमुळे आपल्याला समृद्ध अनुभव मिळतो. पुस्तकासारखा आपला निरपेक्ष मित्र कोणीच नाही. स्पर्धेच्या युगात पुस्तक हाच आपला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे. सर्व विद्यार्थ्यांनी वाचनाचा व्यासंग वाढवावा व दररोज चार तास वाचन करावे शाळेतील ग्रंथालयातील पुस्तकांचा विद्यार्थ्यानी पुरेपूर वापर करावा. शंभर दिवस वाचन उपक्रमाअंतर्गत वेलदुर नवानगर शाळेमध्ये वेळोवेळी अनेक यशस्वी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले व विद्यार्थ्यांमध्ये वाचन क्षमता विकसित होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. Book fair organized at Nawanagar school

शंभर दिवस वाचन उपक्रम यशस्वी करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी एल जी भागवत, केंद्रप्रमुख अशोक गावणकर, विषय शिक्षक परमेश्वर लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक मनोज पाटील, सत्वशीला जगदाळे ,पल्लवी घुले, अंजली मुद्दमवार, निलोफर शेख यांचे मोलाचे सहकार्य लाभले. Book fair organized at Nawanagar school

Tags: Book fair organized at Nawanagar schoolGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.