• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बोडस चॅरिटेबल ट्रस्टचा पुरस्कार जाहीर

by Guhagar News
March 4, 2022
in Ratnagiri
16 0
0
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सिंधुदुर्गला दोन तर रत्नागिरी जिल्ह्याला चार पुरस्कार

गुहागर, दि. 04 : बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे सन २०२१ या वर्षाचे पुरस्कार जाहीर झाले असून प्रथमच एकावेळी तीन महिलांना सन्मानित केले जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला दोन तर रत्नागिरी जिल्ह्याला चार पुरस्कार मिळाले आहेत. एकूण तीन विभागात एक संस्था आणि पाच व्यक्ती यांचा समावेश आहे.  Bodus Charitable Trust Award

त्रैवार्षिक स्वरुपाचा संस्थात्मक पुरस्कार यावर्षी चिपळूण येथील सह्याद्री निसर्गमित्र या संस्थेला मिळाला आहे. रुपये ५००० आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार मिळविणारी ही तिसरी संस्था आहे. शिपोशी, ता. लांजा येथील श्रीमती शालिनी आठल्ये या वयाने सर्वात ज्येष्ठ आहेत, तर कणकवली येथील कवयित्री अनिता साळगांवकर ही वयाने सर्वात तरुण आहे. Bodus Charitable Trust Award

वार्षिक स्वरुपाचा कर्तव्यनिष्ठ पुरस्कार प्राप्त संगमेश्वर येथील जीवशास्त्र विषयाच्या निवृत्त शिक्षिका सौ.उमा शिरीष दामले यांचा समावेश आहे.  ३५ वर्षाच्या सेवेत विद्यार्थी व गर्भवती महिलांसाठी आरोग्यपूर्ण आहार देण्याच्या कार्यासाठी हा पुरस्कार आहे. महावितरणमध्ये सेवा बजावताना डोंगर, दऱ्या, झाडी, काळोख, वारा, पाऊस आणि वादळे यांची पर्वा न करता अगदी निवृत्तीपर्यत पुढे राहणारे कुरधुंडा निवासी हरिश्चंद्र भिकाजी निंगावले हे कर्तव्यनिष्ठ पुरस्काराचे दुसरे मानकरी आहेत. या दोघांनाही सन्मानपत्र व एक पुस्तक दिले जाणार आहे. Bodus Charitable Trust Award

वार्षिक स्वरुपाच्या कार्यगौरव पुरस्काराचे एकूण तीन मानकरी आहेत. नि:स्वार्थी वृत्तीने सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देवून काम करणाऱ्या शिपोशी येथील ८९ वर्षीय श्रीमती शालिनी धोंडदेव आठल्ये या वयाने सर्वात ज्येष्ठ आहेत. नियतीने दिव्यांग बनवले तरी न खचता समुपदेशन करताना इतरांना जगण्याची स्फूर्ती देणारी कणकवली येथील कवयित्री कु अनिता मुरलीधर साळगांवकर ही वयाने सर्वात तरुण आहे. निसर्गाचे वाचन करुन दुर्मीळ रानफुले, किटक, वृक्ष, फुले यांच्या माहितीचा समाज माध्यमातून जगभर प्रसार करणारे व एक जीवंत संदर्भ बनलेले पडेल, ता. देवगड येथील निवृत्त शिक्षक वसंत विनायक काळे हे तिसरे पुरस्कार विजेते आहेत. रुपये ३००० आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. Bodus Charitable Trust Award

सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांना पुरस्काराची रक्कम बॅकेतून दिली जाणार आहे. तर सन्मानपत्र ही रजिस्टर पोस्टाने पाठवण्यात येणार आहेत. असे बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव संतोष देसाई यांनी कळविले आहे. Bodus Charitable Trust Award

Tags: Bodus Charitable Trust AwardGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.