• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गणपतीपुळ्यात ब्लू व्हेल माशाचा अखेर मृत्यु

by Guhagar News
November 16, 2023
in Ratnagiri
153 2
0
Blue whale fish died in Ganpatipula
301
SHARES
860
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

४२ तासांच्या अथक प्रयत्नानंतरही ऑपरेशन ब्लू व्हेल अपयशी

रत्नागिरी, ता. 16 : गणपतीपुळे समुद्रकिनारी आढळून आलेल्या ब्लू व्हेल माशाच्या पिल्लाला वाचवण्यासाठी शर्थाचे प्रयत्न करून देखील त्याचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ग्रामस्थांसह प्रशासनाकडून या माशाचा जीव वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना अपयश आलं आहे. काल (बुधवारी) रात्री व्हेल माशाच्या पिल्लाचा अखेर मृत्यू झाला आहे. Blue whale fish died in Ganpatipula

गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्याजवळ ग्रामस्थांना व्हेल माशाचं पिल्लू बेशुद्ध अवस्थेत सापडलं होतं. या पिल्लाची प्रकृती खालावलेली होती. ग्रामस्थांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाकडून या व्हेल माशाला जिवंत ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. काल या पिल्लाला कापडामध्ये गुंडाळून त्याच्यावर दिवसभर पाण्याचा मारा केला जात होता. भरती सुरू झाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत या माशाला जेसीबीच्या सहाय्याने समुद्रामध्ये ५ ते ६ किलोमीटर पर्यंत आत सोडण्यात आले होते. Blue whale fish died in Ganpatipula

दरम्यान व्हेलला जीवदान देण्यासाठी कपड्यांनी झाकून ठेवून त्यावर सतत पाण्याचा मारा सुरू ठेवण्यात आला. तीन जेसीबी, टग आणि बोटींच्या साह्याने व्हेलला मंगळवारी रात्री खोल समुद्रात सोडण्यात यश आले. दीर्घ श्वास सोडत व्हेलही वेगाने खोल पाण्याच्या दिशेने रवाना झाला आणि ‘ऑपरेशन व्हेल’ चाळीस तासांनी यशस्वी झालं होतं.  Blue whale fish died in Ganpatipula

गणपतीपुळे एमटीडीसी रिसॉर्टच्या बाजूला सोमवारी (ता. १३) किनाऱ्यावर व्हेल मासा वाळूत अडकला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वन विभागाच्या बचावकार्याचे पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पशुवैद्यकीय अधिकारी काळे तसेच मत्स्य विभागाचे प्राध्यापक पावसे यांनी व्हेलची तपासणी केली असता, मासा अशक्त असल्याने त्याला तत्काळ समुद्रात सोडणे गरजेचे होते. Blue whale fish died in Ganpatipula

मंत्रालयातून दूरध्वनीवरून संपर्क साधत व्हेल ऑपरेशनची माहिती मागवण्यात आली. त्यानंतर वन विभागाने कोस्टकार्डशी संपर्क साधून त्यांच्या बोटी मागवल्या. त्यांच्या साह्याने भरतीच्या पाण्यात अवजड व्हेलला ढकलण्याचा प्रयत्न केला; परंतु माशाचे वजन सुमारे ४ टन असल्यामुळे कोस्टगार्डच्या बोटीला ओढणे शक्य झाले नाही. पुढे जयगड मच्छीमार, स्थानिक मच्छीमार संघटनेशी संपर्क साधला, परंतु त्यांच्याकडूनही आवश्यक बोटी व इतर साहित्य उपलब्ध झाले नाही. अखेर वन अधिकारी यांनी जेएसडब्ल्यू कंपनीशी कॅप्टनशी संपर्क साधून टग मागवण्यात आला.  Blue whale fish died in Ganpatipula

माशाच्या रेस्क्यूसाठी ट्रॅवलर व हुक्सची मागवण्यात आले. त्यानंतर जेएसडब्ल्यूचे कॅ. अंकित व एक्सपर्ट टीमच्या मदतीने सायंकाळी ८ वाजता कार्यवाही सुरू केली. रात्री ११-३० वाजता व्हेल माशाला अखेर सुखरूपरित्या समुद्रात सोडण्यात यश आले. नौदलाशी संपर्क साधून हेलिकॉप्टरच्या साह्यानेही प्रयत्न करण्याची तयारी वन विभागाने चालवली होती. मात्र, या पिल्लाचा मृत्यू झाला आहे. Blue whale fish died in Ganpatipula

Tags: Blue whale fish died in GanpatipulaGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share120SendTweet75
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.