महाराष्ट्रातील पाच समुद्रकिनाऱ्यांचा समावेश
गुहागर, ता. 04 : आंतरराष्ट्रीय ब्लु फ्लॅग पायलट दर्जासाठी महाराष्ट्रातील पाच समुद्रकिनाऱ्यांची घोषणा पर्यावरण विभाग व पर्यटन संचालनालय यांनी केली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर समुद्रकिनाऱ्याबरोबर दापोलीतील लाडघर समुद्रकिनाऱ्याचाही सामावेश आहे. यामुळे कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू म्हणून विकसित होतं असलेल्या गुहागरच्या पर्यटन वाढीला मोठा हातभार लागणार आहे. Blue Flag Pilot status for Guhagar beach
आतापर्यंत महाराष्ट्रातील एकही समुद्रकिनारा या महत्वकांक्षी प्रकल्पासाठी निवड झालेला नसताना मुख्यमंत्र्यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प ठरला आहे. तर या वर्षअखेरपर्यंत मुख्यमंत्री स्वताः या समुद्रकिनाऱ्यांना भेट देणार आहेत. ब्लू फ्लॅग राष्ट्रीय ज्युरी सदस्य व राष्ट्रीय ऑपरेटर यांनी महाराष्ट्रातील १० समुद्रकिनाऱ्यांची पहाणी केली होती. त्यापैकी या पहाणीनंतर केलेल्या मुल्यांकनातुन सन २०२५–२०२६ या हंगामासाठी पाच समुद्रकिनाऱ्यांची ‘ब्लू फ्लॅग पायलट दर्जा’ प्रदान केला आहे. यामध्ये डहाणूमधील पारनाका बीच, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन व नागाव बीच तर रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर व लाडघर बीच यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील पर्यटनवाढीसाठी मुख्यमंत्र्यांचा हा महत्वकांक्षी प्रकल्प असुन मुख्यमंत्री स्वता: या प्रकल्पाकडे लक्ष देणार आहेत. यातच या समुद्रकिनाऱ्यांना भेटी देण्यासाठी लवकच दौरा जाहीर होणार आहे. Blue Flag Pilot status for Guhagar beach

गुहागर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी गुहागरच्या पर्यटनवाढीसाठी हे धाडसी मोठे पाऊल उचलले असून याला पहिल्या टप्प्यामध्ये यश आले आहे. ब्लू फ्लॅग मानांकनासाठी गुहागर नगरपंचायतीकडून प्रस्ताव गेल्यानंतर गुहागर समुद्रकिनाऱ्यावर १२ ते १४ ऑगस्टमध्ये राष्ट्रीय ऑपरेटर व ब्लू फ्लॅग कमिटीने भेट दिली होती. या भेटीनंतर केलेल्या मुल्यांकनानुसार ही निवड करण्यात आली आहे. ब्लू फ्लॅक पायलट दर्जा हा वर्षभरात ब्लू फ्लॅग मानांकनासाठी आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा उभ्या करण्यासाठी देण्यात आला आहे. यासाठी ६ किलोमिटर विस्तीर्ण असणाऱ्या गुहागर समुद्रकिनाऱ्यापैकी गुहागर पोलिस परेड मैदानच्या मागील बाजुचा एक किलोमिटरचा समुद्रकिनारा आरक्षित करण्यात आला आहे. Blue Flag Pilot status for Guhagar beach
वर्षभरात उभारणार सोयीसुविधा ब्लू फ्लॅग पायलट दर्जामध्ये वर्षभरात या पाचही समुद्रकिनाऱ्यावर सोयीसुविधा उभारायच्या असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व बंदर विभागाकडून गुहागर नगरपंचायतीला जमिन हस्तांतरण करावी लागणार आहे. यासाठी मुख्यमंत्री पर्यावरण विभाग, पर्यटन विभाग यांचा समन्वय कसा राहतो याकडे लक्ष लागले आहे. समुद्रकिनारी शौचालय, चेंजींग रूम, शॉवर पॅनल, जलशुद्धिकरण प्रकल्प, सौर उर्जा प्रकल्प, शुद्ध पीण्याचे पाणी व्यवस्था, समुद्रकिनाऱ्यावर जाणारा सुसज्ज रस्ता, पथदिप, बसण्यासाठी बाके, समुद्रकिनाऱ्यावर छत्री व आराम खुर्च्या, ओपन जीम, सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक, पार्कंग व्यवस्था, किनाऱ्यावर छोटे-छोटे कोकणी उत्पादन विक्रीचे स्टॉल, अग्नीशामन वाहन आदी सुविधा उभाराव्या लागणार आहेत. यामुळे पुढील वर्ष गुहागरवासीयांसाठी या सुविधा उभारणीचे आव्हान ठरणार आहे. गुहागर नगरपंचायतीने यातील बहुतांशी सुविधा सुरू केल्या असून लवकरच अग्नीशमन वाहनही उपलब्ध होणार असून या सर्व सुविधा उभारणीसाठी प्रयत्नशील आहे. तर पर्यटन वाढीसाठी हे महत्वाचे पाऊल ठरले आहे. Blue Flag Pilot status for Guhagar beach