गुहागर; ता.19 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare – Dhere – Bhosle College) दि. ९ फेब्रुवारी आणि १६ फेब्रुवारी रोजी रक्त तपासणी करण्यात आली. यामध्ये हिमोग्लोबिन RBC, WBC, आणि platelets व इतर विविध घटकांची तपासणी करण्यात आली. या दोन दिवसीय शिबिरात एकूण १९५ लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. Blood test camp in Khare, Dhere, Bhosle College
खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare – Dhere – Bhosle College) राष्ट्रीय सेवा योजना (NSS), महिला विकास कक्ष (WDC) आणि हेल्थ केअर सेंटर तसेच महालँब्स, ग्रामीण रुग्णालय, गुहागर यांच्या संयुक्त विद्यमानाने बुधवार दिनांक ९ फेब्रुवारी आणि १६ फेब्रुवारी २०२२ या दोन दिवसाचे शिबिर संपन्न झाले. Blood test camp in Khare, Dhere, Bhosle College
या कार्यक्रमाच्या उद्घाटनात महाविद्यालाचे प्रभारी प्राचार्य डॉ.अनिल सावंत यांनी कोरोना काळात विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्व स्पष्ट केले ‘जगाचे अस्तित्व कुठपर्यंत, तर मनुष्य जिवंत असेपर्यंत असते’ यासाठी प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. यानंतर ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने आलेल्या प्रतिनिधी आरोही दहिवलकरांनी विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक व आहाराविषयक मार्गदर्शन केले. Blood test camp in Khare, Dhere, Bhosle College
यानंतर महिला विकास कक्षाच्या सौ.रश्मी आडेकर यांनी महिला विकास कक्ष नेहमीच विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असल्याचे स्पष्ट केले. Blood test camp in Khare, Dhere, Bhosle College
या शिबिराचा लाभ महाविद्यालाचे विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, गुहागर परिसरातील महिला व पुरुषांनी लाभ घेतला. Blood test camp in Khare, Dhere, Bhosle College
या महाविद्यालयातील प्रा.पाटील, प्रा.अनिल हिरगोंड, सौ. रश्मी आडेकर व इतर प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.पाटील यांनी केले. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थांच्या सहकार्याने हे शिबीर उत्तमरितीने संपन्न झाले. Blood test camp in Khare, Dhere, Bhosle College