• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
19 June 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरात रक्तदान शिबिर व पेन्शन जागर कार्यक्रम

by Ganesh Dhanawade
April 13, 2022
in Guhagar
16 0
0
गुहागरात रक्तदान शिबिर व पेन्शन जागर कार्यक्रम
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 13 :  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या औचित्याने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन, शाखा गुहागरच्या वतीने उद्या दि. १४ रोजी सकाळी १०.३० वाजता पेन्शनचा जागर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. Blood donation camp in Guhagar

भंडारी भवन सभागृहात सकाळी १०.३० ते ४ या दरम्यान हा कार्यक्रम संपन्न होणार असून या कार्यक्रमास तहसीलदार प्रतिभा वराळे, गट विकास अधिकारी अमोल भोसले, पोलीस निरीक्षक बी. के. जाधव तसेच वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. जुनी पेन्शन हक्क संघटनेतील एनपीएस धारक तलाठी संघटना, ग्रामसेवक संघटना, आरोग्य सेवक, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक इत्यादी कर्मचाऱ्यांचा यात सहभाग असणार आहे. रक्तदान शिबिरासाठी आतापर्यंत 90 लोकांची नोंदणी झाली असून त्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे जुनी पेन्शन हक्क संघटनेचे तालुका अध्यक्ष अमोल धुमाळ यांनी सांगितले. Blood donation camp in Guhagar

या कार्यक्रमात एनपीएस धारक कर्मचारी आपल्या कलागुणांनातून पेन्शनचा जागर करणार आहेत. नाट्य गीत कविता एकपात्री इत्यादी मधून ते आपला कलाविष्कार सादर करणार आहेत. पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे आणि तो घटनेने दिलेला आहे, या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी हा कार्यक्रम घेऊन तालुक्यातील एमपीएस धारक कर्मचारी आपला पेन्शन हक्क अधोरेखित करत आहेत. या कार्यक्रमास तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने करण्यात आलेले आहे. Blood donation camp in Guhagar

Tags: Blood donation camp in GuhagarGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.