विजुअप्पांचा गौरव; आबलोली ग्रामपंचायत आणि मित्र मंडळाचा पुढाकार
गुहागर, ता. 30 : आबलोलीतील सामाजिक कायकर्ते आणि 63 वर्षाच्या आयुष्यात 88 वेळा रक्तदान करणाऱ्या विद्याधर राजाराम कदम (विजुअप्पा) यांच्या वाढदिनी 88 रक्तदात्यांनी रक्तदान केले. ग्रामपंचायत आणि मित्रमंडळाच्या पुढाकाराने विजुअप्पाचा 64 वा वाढदिवस अशा आगळ्यापध्दतीने साजरा करण्यात आला. (Blood Donation camp in Abloli)

विजुअप्पा म्हणून तालुक्याला परिचित असणारे विद्याधर राजाराम कदम हे आबलोली तंटामुक्त समितीचे 11 वेळा अध्यक्ष म्हणून बीनविरोध निवडून आले. आबलोली ग्रामपंचायतीची निवडणूक देखील बीनविरोध करण्यासाठी अनेकवेळा विजुअप्पांनी महत्त्वाची भूमिका बजावली. निस्वार्थपणे गावासाठी झटणाऱ्या विजुअप्पांनी 63 वर्षांच्या आयुष्यात 87 वेळा रक्तदान केले आहे. त्यांचा 63 व्या वाढदिवस शनिवारी (ता. 29 जानेवारी) होता. यावेळी आपल्या मित्राला रक्तदान शिबीराचे आयोजन करुन आगळी वेगळी भेट देण्याचा निर्णय मित्रमंडळींनी घेतला. आबलोली ग्रामपंचायतीनेही या कार्यक्रमाला सहकार्य केले. (Blood Donation camp in Abloli)
सचिन कारेकर यांच्या गारवा कृषी पर्यटन संकुलात हे शिबीर संपन्न झाले. पंचायत समितीच्या सभापती पूर्वी निमुंणकर, उपसभापती सिताराम ठोंबरे, पोलीस निरीक्षक बी. के. जाधव, गुहागर शिवसेना तालुका प्रमुख सचिन बाईत, पंचायत समिती सदस्य रवींद्र आंबेकर, सरपंच तुकाराम पागडे आदी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार आणि दिपप्रज्वलन करून रक्तदान शिबिराचा शुभारंभ केला. जिल्हा रुग्णालय रक्तपेढीच्या जनसंपर्क अधिकारी योगिता सावंत यांनी रक्तदानाचे महत्त्व उपस्थितांना सांगितले. तसेच रक्तदात्यांना जिल्हा रुग्णालया मार्फत मिळणाऱ्या सुविधांची माहिती दिली. (Blood Donation camp in Abloli)
रक्तदान शिबीरात पंचायत समिती सदस्य रविंद्र आंबेकर, आबलोली माजी सरपंच नरेश निमुणकर, प्रमोद गोणबरे, महेंद्र कदम, विजय वैद्य, अल्पिता पवार, पोलीसपाटील महेश भाटकर, गारवा पर्यटन केंद्र आबलोलीचे मालक सचिन कारेकर, ग्रामसंवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्यचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रमेय आर्यमाने यांचेसह पालपेणे गावातील उमेश खैर व मित्र मंडळ तसेच आबलोली गावातील व परिसरातील 87 ग्रामस्थांनी रक्तदान केले. विजुअप्पांनीदेखील आज 88 वे रक्तदान केले. जिल्हा रुग्णालय रक्तपेढीच्या वैद्यकिय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हे शिबीर यशस्वी झाले. (Blood Donation camp in Abloli)
यावेळी माजी सरपंच नरेश निमुणकर, प्रमोद गोणबरे, महेंद्र कदम, विजय वैद्य, अल्पिता पवार, पोलीस पाटील महेश भाटकर, गारवा पर्यटन केंद्र आबलोलीचे मालक सचिन कारेकर, आनंद बुद्ध विहारचे अध्यक्ष दत्ताराम कदम, अविनाश कदम, ग्रामसेवक बी. बी. सूर्यवंशी , खोडदे तंटामुक्ती अध्यक्ष संदीप साळवी, राजेंद्र साळवी, सुहास गायकवाड, महेंद्र रेडेकर, दीपक रेपाळ, अमोल होवाळे, उदय पवार, सुनील जाधव, शिवसेना युवा पदाधिकारी उमेश खैर, सुरेश हडकर, संदेश कदम आदी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. (Blood Donation camp in Abloli)
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुहास गायकवाड यांनी केले तर ग्रामसंवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्यचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रमेय आर्यमाने यांनी सर्व रक्तदाता व उपस्थित मान्यवरांचे तसेच जिल्हा रुग्णालय रत्नागिरी रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आणि पंचक्रोशीतील मदत करणारे सर्व ग्रामस्थ यांचे ग्रामपंचायत आबलोलीच्या वतीने आभार व्यक्त केले. (Blood Donation camp in Abloli)
