भाजपा गुहागर तालुका वतीने आयोजन
गुहागर, ता. 24 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष गुहागर तालुका वतीने गुहागर ग्रामीण रूग्णालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराला रक्तदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष अभय भाटकर यांनी श्रीफळ वाढवून केले. या रक्तदान शिबीरात ५५ जणांची नोंदणी झाली. आरोग्य पथकाकडून परिपूर्ण तपासणी केल्यानंतर २८ जणांनी प्रत्यक्ष रक्तदान केले. Blood Donation Camp by BJP

या रक्तदान शिबीरावेळी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, डॉ सौ. विनिता नातू, भाजपा गुहागर माजी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, चिपळूण माजी तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, सचिन ओक, गुहागर शहराध्यक्ष नरेश पवार, संतोष सांगळे, मंगेश रांगळे, अरूण गांधी, संगम मोरे, विनायक सुर्वे, पंचायत समिती माजी सदस्य विजय भुवड, संजय मालप, उमेश भोसले, आशिष विचारे, महेश तोडणकर, अपूर्वा बारगोडे, प्रांजली कचरेकर, काताळे सरपंच प्रियांका सुर्वे, ज्योती परचुरे, वृक्षाली ठाकूर, स्मिता जांगळी, संदिप हळदणकर, हेदवी उपसरपंच एकनाथ बसणकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. Blood Donation Camp by BJP
