श्री स्वामी समर्थ सेवा व संतोष अबगुल प्रतिष्ठान तर्फे आयोजन
गुहागर, ता. 14 : श्री स्वामी समर्थ सेवा, शनि मंदिर, गासकोपरी, विरार पूर्व आणि संतोष अबगुल प्रतिष्ठान यांच्या मार्गदर्शनाने रक्तदान रक्तदान शिबाराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर रविवार दि. 12 ऑक्टोबर रोजी विरार पूर्व येथील चिंतामणी हॉल, समीक्षा कॅटरेस, हरिगंगा मार्केट येथे संपन्न झाले. Blood donation camp at Virar

यावेळी असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना श्री स्वामी समर्थ सेवा मंडळातर्फे प्रशंसापत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी श्री विलास कांबळे माऊली, श्री सुनील पानगले माऊली, श्री भरत हुमणे माऊली, श्री. निलेश कुलये माऊली या श्री स्वामी समर्थ माऊलींचे विशेष सहकार्य लाभले. Blood donation camp at Virar
