2 कोटी 31 लाख रुपयांचा ऐवजात 2000 च्या 7298 नोटा
Guhagar News : Black Money Found in DOIT Jaipurदोन हजाराच्या नोटांचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 2.31 कोटी (2.31Cr.) रुपयांचे काळे धन सापडले. यामध्ये 2000 रुपयांच्या तब्बल 7298 नोटा सापडल्या आहेत. ही घटना राजस्थानची राजधानी जयपूर येथील योजना भवन मधील आहे. अशी माहिती राजस्थानच्या मुख्य सचिव उषा शर्मा, पोलिस महासंचालक उमेश मिश्रा आणि जयपूरचे पोलीस आयुक्त आनंद श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितली.


Black Money Found in DOIT Jaipur
जयपूर येथील सचिवालयाजवळ योजना भवन ही शासकीय इमारत आहे. या इमारतीमध्ये माहिती आणि तंत्रज्ञान विभाग (DOIT) कार्यालयात सध्या संगणकीकरण करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे विविध ठिकाणी पडून असलेल्या फाईल शोधुन त्यातील आवश्यक, महत्त्वाचा डाटा संकलीत करण्याच काम सुरु आहे. योजना भवनाच्या बेसमेंटमध्ये असलेल्या कपाटांमधील फाईल काढण्याचे काम करताना तेथील दोन कपाटांच्या चाव्या मिळत नव्हत्या. चाव्यांची शोधाशोध करुनही चाव्या न सापडल्याने अखेर तेथील DOIT च्या अधिकाऱ्यांनी पोलीसांच्या देखरेखीमध्ये पंचनामा करुन या कपाटांची कुलुपे फोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तेथील एका कपाटामध्ये फाईलींबरोबर एक बँग सापडली. Black Money Found in DOIT Jaipur
बँगमधील काळे धन
₹ 2000 च्या 7,298 नोटा म्हणजेच 1 कोटी 45 लाख 96 हजार रुपये
₹ 500 च्या 17 हजार 107 नोटा म्हणजेच 85 लाख 53 हजार 500 रुपये
मेड इन स्वित्झर्लंड असा शिक्का असलेले 1 किलो सोन्याचे बिस्किट
(ज्याची बाजारभावाप्रमाणे किंमत 63 लाख रुपये इतकी आहे.)
या सर्वांची एकत्रीत किंमत 2 कोटी 31 लाख (2.31Cr) रुपये आहे.
कोटीच्या घरातील काळेधन सापडल्यानंतर DOIT चे अधिकारी आणि पोलीस यांनी तातडीने वरीष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर जयपूरचे पोलीस आयुक्त आनंद श्रीवास्तव यांनी घटनास्थळी पोचून मुद्देमाल जप्त केला.


काळे धन आले कसे
पोलीसांच्या प्राथमिक तपासात हे काळे धन निविदा प्रक्रियेमधील असल्याचे समोर येते आहे. काही महिन्यांपूर्वी ज्या कंत्राटदारांना कोट्यवधी रुपयांच्या निविदा देण्यात आल्या त्यांच्यापैकी कोण्या एकामार्फत किंवा समुहामार्फत एकत्रीतरित्या ही रक्कम घेण्यात आली असावी असा संशय आहे. Black Money Found in DOIT Jaipur
टी. एन. शर्मा यांचे आरोप
माहिती आणि तंत्रज्ञान विभाग (DOIT) कार्यालयात प्रोग्रामर म्हणून काम करणाऱ्या टी. एन. शर्मा यांनी महिनाभरापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा देताना माहिती आणि तंत्रज्ञान विभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. तसेच सार्वजनिक माध्यमांवर माहिती आणि तंत्रज्ञान विभागातील भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असे सांगितले होते. Black Money Found in DOIT Jaipur


पोलीसांची कारवाई सुरू
एवढी मोठी रक्कम (2.31Cr) सापडल्याने तातडीने जयपूरचे पोलीस आयुक्त आनंद श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली जयपूर शहर पोलीसांनी चौकशी सुरु केली. योजना भवनमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेवून त्याची पहाणी सुरु केली. आत्तापर्यंत पोलीसांनी 6 जणांना ताब्यात घेतले आहे. शर्माच्या आरोपांनाही पोलीसांनी गांभिर्याने घेतले असून त्या दिशेनेही तपास सुरु आहे. Black Money Found in DOIT Jaipur