• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळुणात भाजपचा विजयोत्सव

by Ganesh Dhanawade
June 11, 2022
in Politics
16 0
0
BJP's victory in Chiplun

चिपळूण नगरपरिषद समोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण

32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता.11 : चिपळूण येथे नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपाने तीन जागांवर यश संपादन केल्याबद्दल चिपळूण भाजपने विजयोत्सव साजरा केला. यावेळी चिपळूण नगरपरिषद समोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विजयी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. BJP’s victory in Chiplun

नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपकडून नेते पियुष गोयल, माजी कृषीमंत्री अनिल बोंडे तर धनंजय महाडिक या तिघांनी विजय संपादन केला. तत्पूर्वी महाविकास आघाडीकडून सेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार विजयी होतील असा दावा केला जात होता. मात्र, कोल्हापुरातील धनंजय महाडिक यांनी सेनेचे संजय पवार यांचा पराभव करून भाजपने तिसरी जागा जिंकत महाविकास आघाडीला धोबीपछाड देण्यात यश मिळवले आहे. या विजयाबद्दल मुंबई मुख्यालयात भाजपने विजयोत्सव साजरा केला. BJP’s victory in Chiplun

याच पद्धतीने चिपळूनात देखील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. चिपळूण नगरपरिषदे समोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विजयी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. यावेळी माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, माजी नगरसेवक विजय चितळे, परिमल भोसले, माजी नगरसेविका सौ. रसिका देवळेकर, नुपूर बाचीम, जिल्हा उपाध्यक्ष रामदास राणे, संतोष भडवळकर, तालुका अध्यक्ष वसंत ताम्हणकर, निखिल किल्लेकर, सुनीत खेराडे आदी उपस्थित होते. BJP’s victory in Chiplun

Tags: BJPBJP's victory in ChiplunGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्याभाजपमराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.