• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 December 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्हा परिषद पंचायत समिती भाजपच्या प्रचाराला सुरुवात

by Guhagar News
December 13, 2025
in Guhagar
137 1
1
BJP's election campaign begins
268
SHARES
766
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी केला नारळ वाढवून शुभारंभ

गुहागर, ता. १३ : भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सतीश जी मोरे यांनी काल शुक्रवारी गुहागर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात बैठक घेऊन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक या संदर्भात भाजपाला यश मिळवून देण्यासाठी प्रचाराचा श्रीफळ वाढवून  शुभारंभ केला. BJP’s election campaign begins

BJP's election campaign begins

गुहागर कार्यालयमध्ये शुक्रवारी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, तालुकाध्यक्ष अभय भाटकर, तालुका सरचिटणीस संतोष सांगळे, महिला आघाडी अध्यक्ष प्रांजली कचरेकर, ओबीसी यांचे अध्यक्ष मंगेश रांगले, तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद समिती गणातील आणि गटातील प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. BJP’s election campaign begins

BJP's election campaign begins

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष सतीश मोरे म्हणाले की, गुहागर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या असणाऱ्या सर्व जागा या आपण प्रामाणिकपणे लढवायच्या आहेत. युतीचा निर्णय काय करावा या संदर्भात वरिष्ठ नेते आपले निश्चितच निर्णय घेतील. आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण. माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पंचायत समितीने जिल्हा परिषद निवडणूक लढवायची आहे. नुकतीच गुहागर नगरपंचायत निवडणूक आपण यशस्वीपणे लढवली आहे. यामध्ये यश आपल्याच आहे. यात माझ्या मनात कोणतीही शंका नाही. ज्याप्रमाणे आपण ही निवडणूक यशस्वीरित्या पार पडली त्याचप्रमाणे गुहागर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक सुद्धा आपल्याला ताकतीन लढवायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला आतापासून तयारी लागावी लागणार  असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घ्या. बूथ अहवाल तयार करा. BJP’s election campaign begins

BJP's election campaign begins

तालुकाध्यक्ष अभय भाटकर यांनी येऊ घातलेल्या दिवसांमध्ये कशाप्रकारे नियोजन करावे. याचे मार्गदर्शन केले. प्रत्येक गटामध्ये कार्यकर्त्यांनी एकत्रपणे फिरण्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर गुहागर समुद्रकिनारी सर्व गाड्या एकत्र करून गाड्यांसमोर भारत माता की जय. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. अशा घोषणा देत श्रीफळ वाढवून भारतीय जनता पार्टीने जिल्हा परिषदेने पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी सर्वच गणातील कार्यक्रम कार्यकर्ते उपस्थित होते. BJP’s election campaign begins

BJP's election campaign begins

Tags: BJP's election campaign beginsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share107SendTweet67
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.