• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरला लागलेले ग्रहण 2024 ला घालवूया

by Ganesh Dhanawade
October 29, 2023
in Guhagar
281 3
0
BJP state president Wagh criticizes MLA Jadhav
552
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

भाजप प्रदेशाध्यक्ष सौ. चित्रा वाघ यांची आ. जाधवांवर टीका

गुहागर, ता. 29 : गुहागर कधी राष्ट्रवादीचं नव्हत. ते कधी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नव्हते. हे गुहागर भारतीय जनता पार्टीचे होते. नातू कुटुंबाने गेली 40 वर्ष भाजपचा झेंडा गुहागर विधानसभेवर फडकवत ठेवला. परंतु, गेली दहा वर्ष भास्कर जाधवांच्या रूपाने इथल्या जनतेच्या मानगुटीवर बसलेले ग्रहण येत्या 2024 च्या निवडणुकीत एक दिलाने काम करून घालवायचे आहे, असे प्रतिपादन भाजपच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष सौ. चित्रा वाघ यांनी केले. यावेळी त्यांनी कोकणात येत्या काळात अनेक भूकंप होणार असल्याचे सूचक वक्तव्यहि केले. BJP state president Wagh criticizes MLA Jadhav

BJP state president Wagh criticizes MLA Jadhav

भारतीय जनता पार्टीच्या वतीने गुहागर तालुक्यातील आबलोली खोडदे येथे पक्षप्रवेश व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले, प्रज्ञा ढवण, प्रदेश सरचिटणीस सौ. मंजुषा कुद्रिमोती, प्रदेश सचिव शिल्पा मराठे, भाजपच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेखा खेराडे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर, रामदास राणे, माजी नगरसेवक परिमल भोसले, तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, यशवंत बाईत, विठ्ठल भालेकर, लक्ष्मण शिगवण, रत्नदीप देवळे, प्रेरणा भोसले, रश्मी पालशेतकर, दीपलक्ष्मी पडते, शितल दिंडे, अंजली साळवी, किशोर आंब्रे, विनोद चाळके आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. BJP state president Wagh criticizes MLA Jadhav

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्षा वाघ यांनी गुहागर विधानसभेचे आ. भास्कर जाधव यांचा खुरपूस समाचार घेतला. इथल्या भोळ्या जनतेचा फायदा घेऊन विकासापासून वंचित ठेवण्याचे काम इथल्या आमदाराने केले. संपूर्ण कोकणामध्ये जत्रा आणि सणांमध्ये सोंगे दाखवली जातात. ती सोंगे राज्यातही प्रसिद्ध आहेत. हे जे तुमचे गुहागरचे सोंग ते गेली दहा वर्ष तुमच्या मानगुटीवर बसले आहे. 2024 ला त्यांच्या रूपाने गुहागरला लागलेले ग्रहण घालवायचे आहे. यासाठी आपल्याला कामाला लागले पाहिजे असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. राजकारणात काम करत असताना बाईला बाजूला करणे, घरघरात भांडणे लावायचे काम हे जर कोणी केले असेल तर तुमच्या आमदाराने केले. आज पर्यंत १० वर्ष आमदार आहेत. लोकांना रोजगाराचे, पर्यटन व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न केले नाहीत. विकासाची कोणतीच कामे करायची नाहीत पण दिखावपणा जास्त अशी इथली परिस्थिती आहे, असा टोला देखील वाघ यांनी लगावला. BJP state president Wagh criticizes MLA Jadhav

BJP state president Wagh criticizes MLA Jadhav

डॉ. विनय नातू त्यांचे वडील डॉ. तात्या नातू यांनी गेली 40 वर्ष भाजपचा झेंडा गुहागर विधानसभेवर फडकत ठेवला आणि अपघातानेच काही लोक गुहागरमध्ये आली. त्यांनाही आता घरी पाठवण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले. त्यांचे सरकार होते तेव्हा पद द्या, पद द्या, यासाठी सर्व ठिकाणी जात होते. त्यावेळी यांना कोणीच विचारलं नाही. आणि आता शिल्लक राहिलेल्या सेनेत बाकी कोणी राहिले नाही म्हणून भुकण्यासाठी यांना ठेवले आहे. महिलांवर बोलताना हा माणूस मागे पुढे पाहत नाही. अशा माणसाला एकदा सांगितले होते, तुम्हाला नाच्याचे काम चांगले येते, तेवढेच तुम्ही करा. महिलांच्या प्रश्नावर बोलण्याची तुम्हाला गरज नाही. तुम्हाला बोलण्याचा तो नैतिक अधिकारही नाही, असे प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ म्हणाल्या. BJP state president Wagh criticizes MLA Jadhav

तुमचे माजी नगरसेवक परिमल भोसले यांनी आपल्या भाषणात भास्कर जाधव यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. इथल्या कार्यकर्त्यांनी भास्कर जाधव यांना घाबरण्याचे काही कारण नाही. असे शंभर भास्कर जाधव मी पाहिले आहेत. 2024 मध्ये गुहागर मतदार संघ आपल्याला घ्यायचा असेल तर अंगावर घ्यायला शिका असे आवाहन कार्यकर्त्यांना करतानाच आपल्या पाठीशी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार निलेश राणे, आणि चित्राताई वाघ खंबीरपणे उभे आहेत. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेतून फुटलेल्या चाळीस आमदारांमध्ये यांचाही नंबर होता, हे बॅग भरून गेले होते. पण तिथे घेतले नाही. त्यामुळे ते आता माशासारखे फडफडत आहेत असा आरोप देखील भोसले यांनी केला. रामदास राणे यांनीही आ. जाधव यांच्यावर तोंड सुख घेतले. गुहागरला आज ग्रहण लागले आहे. गुहागरात काय काय सुरू आहे यावर लवकरच बोलणार आहे. निवडणुका लागू दे, मग यांचे ढोल वाजवूया, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी इथला रोजगार, पर्यटन, सीआरझेड, रत्नागिरी गॅस प्रकल्पातून कमी करण्यात येणाऱ्या कामगारांचा प्रश्न उपस्थित केला. ओबोसे सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी गेलेला मतदार संघ पुन्हा मिळवायचा आहे. पुढचा आमदार हा भाजपचाच असेल, अशी ग्वाही सर्व भाजप पदाधिकाऱ्यांना दिली. BJP state president Wagh criticizes MLA Jadhav

यावेळी आबलोली ग्रामपंचायतीच्या नम्रता निमुनकर यांनी आपल्या असंख्य महिला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून भाजप मध्ये प्रवेश केला. तसेच गुहागर मतदार संघातील खेड येथील अनेक कार्यकर्त्यांनीहि ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांच्यावर विश्वास ठेवून प्रवेश केला आहे. BJP state president Wagh criticizes MLA Jadhav

Tags: BJP state president Wagh criticizes MLA JadhavGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share221SendTweet138
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.