संपर्क अभियानांतर्गत प्रवास, भाजपमध्ये चैतन्य
गुहागर, ता. 17 : संपर्क अभियानाचा भाग म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या कोकण दौऱ्यावर येत आहेत. रायगड लोकसभेचा भाग असलेल्या दापोली आणि गुहागर विधानसभा मतदारसंघात ते 18 ऑक्टोबरला प्रवास करणार आहेत. त्याच्या दौऱ्याच्या नियोजनाच्या निमित्ताने गुहागरमधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. BJP state president on visit to Guhagar
दापोलीतील कार्यक्रम संपल्यावर 18 ऑक्टोबरला सायंकाळी दाभोळ मार्ग चंद्रशेखर बावनकुळे धोपाव्यात येतील. तेथून मोटारीने ते गुहागर मार्गे शृंगारतळीला जातील. गुहागर शहरातील श्री दुर्गादेवी मंदिराला भेट देवून ते श्री दुर्गादेवीचे दर्शन घेणार आहेत. शृंगारतळीत काही मंडळींशी संपर्क, एक छोटी सभा, कार्यकर्त्यांबरोबर बैठक असा त्यांचा कार्यक्रम रहाणार आहे. यावेळी निळकंठेश्र्वर मंदिर ते बाजारपेठ हे अंतर ते पायी चालणार आहेत. त्यावेळी शृंगारतळीतील ग्रामस्थांशी देखील ते संपर्क करतील. येथील कार्यक्रम झाल्यानंतर ते तवसाळ, जयगड मार्गे रत्नागिरीला जाणार आहेत. BJP state president on visit to Guhagar
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रथमच गुहागर आणि श्रृंगारतळीत येत आहेत. त्यामुळे येथील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात एकाच ठिकाणी कार्यक्रम होत असल्याने गुहागर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांना शक्ती प्रदर्शन करण्याची आयती संधी चालून आली आहे. त्यामुळे प्रत्येक शक्तीकेंद्रातून कार्यकर्ते, मतदार यांना आणण्याचे नियोजन भाजपने सुरु केले आहे. BJP state president on visit to Guhagar