• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळणेश्वर जि. प. गटात हळदीकुंकू व संगीत खुर्ची स्पर्धा

by Manoj Bavdhankar
February 25, 2021
in Old News
16 0
0
वेळणेश्वर जि. प. गटात हळदीकुंकू व संगीत खुर्ची स्पर्धा
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जयेश वेल्हाळ फाऊंडेशन व भाजप गुहागरच्या वतीने आयोजन

गुहागर, ता. 25 : तालुक्यातील वेळणेश्वर जिल्हा परिषद गटात गुहागर तालुका भारतीय जनता पार्टी  व जयेश वेल्हाळ फाउंडेशन यांच्यावतीने महिलांकरता हळदीकुंकू समारंभ व संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जि. प. गटातील पाच मध्यवर्ती गावात झालेल्या कार्यक्रमात सुमारे 1100 पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतला. प्रत्येक सहभागी महिलेला भेटवस्तू देण्यात आली. तर संगीत खुर्ची स्पर्धेत विजयी झालेल्या महिलांना विशेष बक्षिस देवून गौरविण्यात आले.
वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातील साखरी आगर, जामसुत, वाघांबे, दोडवली, कोतळूक या पाच मध्यवर्ती ठिकाणी हळदीकुंकु समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. येणाऱ्या प्रत्येक महिलेला हळदीकुंकवासोबत तिळगुळ, पुष्प आणि भेटवस्तु देण्यात आली. तसेच या पाचही ठिकाणी उपस्थित महिलांनी संगीत खूर्ची या खेळाचा आनंद लुटला.
साखरी आगरमध्ये झालेल्या संगीत खुर्ची स्पर्धेत निधी निलेश कदम प्रथम तर आरोही सुनील तेरेकर यानी द्वीतीय क्रमांक पटकावला. जामसुतमधील स्पर्धेत प्रज्ञा प्रभाकर कुंभार हिने प्रथम तर सृष्टी संतोष साळवी हिने द्वितीय क्रमांक पटकावला. वाघांबेमध्ये योगिता घनश्याम जोशी यांनी प्रथम तर मीनाक्षी अजित कावणकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. दोडवली मध्ये प्रमिला प्रकाश मोरे यांनी प्रथम तर आरती लक्ष्मण मुरमुरे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. तर कोतळूकमध्ये निर्मिती नरेश भेकरे यांनी प्रथम तर आदिती अनंत भेकरे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
ग्रामीण भागात हळदी कुंकु समारंभासोबत असा मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवल्याबद्दल सर्वच महिलांनी आयोजकांना धन्यवाद दिले. पाच ठिकाणी झालेल्या संगीत खूर्ची स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान साखरीआगर कातळवाडी येथील हळदीकुंकु समारंभात करण्यात आला. या बक्षिस वितरण जयेश वेल्हाळ फाऊंडेशनच्या सौ. जान्हवी वेल्हाळ, भाजपा उत्तर रत्नागिरी क्रीडा व सांस्कृतिक सेलेचे जिल्हा संयोजक जयेश वेल्हाळ, भाजप तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, तालुका सरचिटणीस सचिन ओक, आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित पार पडले. यावेळी दोडवलीचे माजी सरपंच संजय गडदे, शंकर घाणेकर, प्रकाश कावणकर, नम्रता घाणेकर, साखरी आगर उपसरपंच सुरेश कदम, विनायक कदम, अल्केश कदम, संतोष कदम आदींसह वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातील महिला भगिनी उपस्थित होत्या.
भविष्यातही महिलांच्या, युवकांच्या, युवतींच्या कलागुणांना वाव देणारे  सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक उपक्रम वेळणेश्वर जिल्हा परिषद गटात राबवणार असल्याचे उत्तर रत्नागिरी क्रीडा व सांस्कृतिक सेलचे संयोजक श्री जयेश संजीवन वेल्हाळ यांनी सांगितले.

Tags: BJPGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsMarathi NewsNews in GuhagarNews in Marathiटॉप न्युजताज्या बातम्याभाजपामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.