गुहागर, ता. 17 : आज अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारांची गर्दी झाली होती. आज भारतीय जनता पार्टी कडून रॅलीने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. नीता मालप यांनी आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला. BJP files Nomination papers

महायुती मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आधीच बाहेर गेला असून त्यांनी आपलाही स्वतंत्र उमेदवारी अर्ज आज दाखल केला. शिंदे शिवसेनेच्या वतीने ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज मयुरी मूकनाक यांनी दाखल केला. सद्यस्थितीत भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेनेने दोघांकडूनही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. BJP files Nomination papers