गुहागर, ता. 08 : भारतीय जनता पार्टीच्या वतीने 6 एप्रिल हा स्थापना दिवस संपूर्ण देशभर उत्साहामध्ये आणि विविध सामाजिक कार्यक्रमाने पुढील एक आठवडाभर साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी गुहागर शहराच्या पदाधिकारी यांच्या वतीने गुहागर समुद्रकिनारी स्वच्छता राबविण्यात आली. BJP cleanliness drive in Guhagar

दि. 06 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर ध्वजारोहण करून कार्यालयामध्ये भारत मातेचे पूजन करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी गुहागर कीर्तन वाडी येथील जीवन शिक्षण शाळा नंबर एक शाळेतील मुलांच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाच्या वेळी येथील मुलांना खाऊ वाटप करून त्यांच्या समवेत वर्धापन दिन साजरा करण्यात आला. आठ एप्रिल रोजी सकाळी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. तर उद्या 9 एप्रिल रोजी सकाळी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात येणार आहे. तसेच सकाळी 10 वाजता गुहागर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने शोभायात्रा काढण्यात येणार आहे. BJP cleanliness drive in Guhagar

यावेळी गुहागर समुद्र किनारी झालेल्या स्वच्छता मोहीम मध्ये गुहागरच्या नगराध्यक्ष सौ नीताताई मालप, गुहागर शहराध्यक्ष नरेश पवार, शिक्षण सभापती वैशाली मावळणकर, नगरसेविका विशाखा सोमण, नगरसेवक संतोष सांगळे, शहर युवा अध्यक्ष मंदार पालशेतकर, माजी नगरसेवक गजानन वेल्हाळ, विकास जाधव, विकास मालप, ओम भोसले, कौस्तुभ गद्रे उपस्थित होते. तसेच उद्या होणाऱ्या शहरातील शोभायात्रा रॅलीला बहुसंख्येने कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गुहागर शहराध्यक्ष गणेश पवार यांनी केले आहे. BJP cleanliness drive in Guhagar
