गुहागर, दि. 04 : निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्या उपसरपंच पदी प्रभाग क्रमांक एक मधील सदस्य आशिष राजाराम भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माजी उपसरपंच तुकाराम पागडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे. सरपंच श्रावणी अनिकेत पागडे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत आशिष भोसले यांना निवड झाल्याचे नियुक्तीपत्र देण्यात आले. Bhosle Deputy Panch in Aabaloli


गेली पंचवीस वर्षे सर्व ग्रामस्थांच्या सहविचाराने तंटामुक्त समितीच्या माध्यमातून आबलोली ग्रामपंचायतची सदस्य, सरपंच, उपसरपंच निवड बिनविरोध होत आहे. सर्व प्रभागांना सरपंच-उपसरपंच पदाचा कालावधी निश्चित करून त्याप्रमाणे संधी उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व निवडी बिनविरोध होत आहेत. नूतन उपसरपंच आशिष भोसले यांना शैक्षणिक, सामाजिक कार्याची आवड असून त्यांनी समाजासाठी आपले योगदान दिले आहे. Bhosle Deputy Panch in Aabaloli
आशिष भोसले यांची निवड झाल्याबद्दल सरपंच श्रावणी अनिकेत पागडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष विद्याधर राजाराम उर्फ विजूआप्पा कदम, पोलीस पाटील महेश भाटकर, माजी सरपंच महेंद्र कदम, विजय वैद्य, सचिन कारेकर, ग्रामसेवक बी. बी. सूर्यवंशी, तलाठी बी.बी. राठोड, अनिकेत पागडे, दत्ताराम कदम, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम पागडे, प्रमेय आर्यमाने, मीनल कदम, पुजा कारेकर,भारती कदम, मुग्धा पागडे,साक्षी रेपाळ , सुनिल भोसले, नंदन भोसले, श्रीधर भोसले, गजानन भोसले, दिनेश भोसले, तृषांत सुर्वे, योगेश भोसले, अमोल शिर्के, प्रकाश बोडेकर यांसह गावातील सर्व वाड्यांचे प्रमुख मंडळी यांनी अभिनंदन केले आहे. Bhosle Deputy Panch in Aabaloli
गावातील सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन ज्येष्ठांच्या सल्ल्यानुसार गावाचा विकास अविरत सुरू ठेवण्याचा आपला प्रयत्न राहील असे आश्वासन नवनिर्वाचित उपसरपंच आशिष भोसले यांनी दिले. गावातील सर्व समाज घटकातून भोसले यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. Bhosle Deputy Panch in Aabaloli

