• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 October 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

छ. संभाजीराजे भोसलेंचे आमरण उपोषण थांबवावे

by Guhagar News
February 28, 2022
in Guhagar
16 0
0
Bhosale's fast should be stopped

तहसिलदार प्रतिभा वराळे यांच्याकडे निवेदन देताना गुहागर क्षत्रिय ज्ञाती मराठा समाज

31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

भोसले यांच्या आमरण उपोषणास गुहागर क्षत्रिय ज्ञाती मराठा समाजाचा पाठिंबा

गुहागर, दि. 28 :  महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या मराठा समाजाच्या न्याय व हक्कांच्या मागण्यासाठी युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले (Sambhaji Raje Bhosle) यांच्या आमरण उपोषणास क्षत्रिय ज्ञाती मराठा समाज संघटना, गुहागर. यांचा पाठिंबा असलेबाबतचा निवेदन मुख्यमंत्री यांना देण्यासाठी गुहागर तहसिलदार प्रतिभा वराळे (Tehsildar Pratibha Varale)  यांच्याकडे सादर करण्यात आले. यावेळी अध्यक्ष डॉ. प्रकाश शिर्के, अनिल शिंदे, भगवान कदम, ॲड संकेत साळवी, जय शिर्के, शरद विचारे, मोहन कदम, विजय विचारे, अविनाश शिर्के, निखिल साळवी, मंदार कदम आदी उपस्थित होते. Bhosale’s fast should be stopped

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, अखंड महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे आराध्य दैवत असलेले श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या स्वराज्याची निर्मिती केली त्याच स्वराज्यात त्यांच्या वंशजांना आपल्या रयतेच्या न्याय व हक्कासाठी उपोषणाला बसावे लागत आहे. ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत शरमेची व खेदाची बाब आहे. मराठा समाजाच्या आरक्षण सोडून इतर मागण्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने मान्यता देण्यात आल्या होत्या. परंतु अजूनही शासनाच्या वतीने त्याबाबत कोणतीही अंमलबजावणी होताना दिसत नाही. तरी त्या प्रमुख मागण्यांपैकी काही मागण्या पुढीलप्रमाणे करण्यात आल्या आहेत. Bhosale’s fast should be stopped

प्रमुख मागण्यांपैकी काही मागण्या पुढीलप्रमाणे

आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ मार्फत देण्यात येणाऱ्या व्याज परताव्याची मर्यादा वाढवावी.  भरीव आर्थिक निधीची तरतूद करून महामंडळाकडे पैसे वर्ग करावेत. सध्या या महामंडळाला पूर्ण वेळ कार्यकारी संचालक व धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आवश्यक असणारे संचालक मंडळ नेमणे.  सारथी संस्थेच्या सबलीकरणासाठी रोड मप तयार करून सारथी संस्थेचे सक्षमीकरण करावे. आणि येणाऱ्या आर्थिक वर्षात्तील अर्थ संकल्पात यासाठी भरीव निधीची तरतूद करावी.  ESBC व SEBC आरक्षणाच्या माध्यमातून शासकीय सेवेत निवड झालेल्या परंतु अद्याप नियुक्ती न  झालेल्या उमेदवारांना त्यांची ज्या पदावर निवड झालेली आहे, त्याच पदावर कायम स्वरूपी नियुक्ती द्यावी. आंदोलन करणाऱ्या तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत शासनाने काढलेल्या नव्या शासन निर्णयात झालेल्या मालमत्तेचे नुकसान भरपाई बाबत उल्लेख आहे. त्यावर सकारात्मक दृष्टीने विचार करून ते गुन्हे मागे घ्यावेत. तसेच नव्याने मुंबई पोलिसांनी २०१७ मध्ये निघालेल्या बाईक रली च्या सहभागी सर्वांवर नोटीसा काढलेल्या आहेत. त्या देखील रद्द करण्यात याव्यात.

मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनातून ज्यानी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याच्या आश्वसनाची पूर्तता करावी. कोपर्डी खून खटल्याची लवकरात लवकर सुनावणी घेण्याबाबत शासनाने पाठपुरावा करून आरोपींना फाशी होण्यासाठी आग्रही रहावे. मराठा समाजाच्या विद्यार्थांसाठी व तरुणांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह तत्काळ सुरु करावेत.  मराठा आरक्षण मिळविण्यासाठी अपेक्षित न्या. दिलीप भोसले यांच्या समितीने सांगितलेले १२ मुद्दे व मराठा आरक्षण मिळविण्यासाठी आवश्यक निर्णय शासनाने गांभीर्याने घेऊन पुढील कार्यवाही सुरु करावी. परंतु तोपर्यंतच्या काळात समाजाचे शैक्षणिक व सामाजिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाने सहानुभूती पूर्वक विचार करून वरील मागण्यांची अंमलबजावणी त्वरित करावी ही विनंती. Bhosale’s fast should be stopped

या वरील सर्व मागण्यांवर शासनाने त्वरित योग्य तो सकारात्मक  निर्णय घेऊन छत्रपती संभाजीराजे भोसले (Sambhaji Raje Bhosle) यांनी सुरु केलेले आमरण उपोषण थांबवावे. या उपोषणाच्या दरम्यान त्यांचे प्रकृतीवर काही परिणाम झाल्यास अथवा त्यांचे जीवितास धोका उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची राहील. त्या अनुषंगाने होण्याऱ्या पुढील सर्व परिणामांचीही सर्वस्वी जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाची असेल. तरी वरील सर्व मागण्यांवर त्वरित योग्य तो निर्णय घेण्यात यावा. अशी विनंती क्षत्रिय ज्ञाती मराठा समाज संघटना, गुहागर यांनी केली आहे. Bhosale’s fast should be stopped

Tags: Bhosale's fast should be stoppedGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.