• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वरवेलीत जलजीवन नळपाणी योजनेचे भूमिपूजन

by Ganesh Dhanawade
September 25, 2023
in Guhagar
129 1
0
Bhoomipujan of Varveli Jaljeevan Nalpani Yojana
253
SHARES
723
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 25 : तालुक्यातील वरवेली ग्रामपंचायतच्या वतीने जल जीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेच्या मोडकाआगर धरण नजीक विहीरीचे भूमिपूजन आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. Bhoomipujan of Varveli Jaljeevan Nalpani Yojana

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, सरपंच नारायण आगरे, उपसरपंच मृणाल विचारे, युवा कार्यकर्ता प्रशांत विचारे, गणेश किर्वे, अनंत रांजाणे, जितेन्द्र विचारे, संदीप विचारे, सुहास विचारे, जयंत विचारे, दीपक किर्वे, वैभव पवार, पोलीस पाटील सुजित शिंदे, ग्रामपंचायत सदस्य शैलेश नारकर, नरेश रांजाणे, संदीप पवार, श्रावणी शिंदे, अरुण रावणग, सेजल शिंदे, धनश्री चांदोरकर, संतोष देसाई, दीपक विचारे, विलास किर्वे, राजहंस विकास मंडळ वरवेली रांजाणेवाडी अध्यक्ष अविनाश रांजाणे, राजहंस नमन मंडळ गट क्रमांक १ चे अध्यक्ष अनंत जावळे, ग्रामसेवक महेंद्र भूवड आदी उपस्थित होते. Bhoomipujan of Varveli Jaljeevan Nalpani Yojana

आ. जाधव यावेळी बोलताना म्हणाले की, जलजीवन मिशनचे ठेकेदार हे विशिष्टय पक्षाचे असल्याने जाणीव पुर्वक माझ्या मतदारसंघातील नळपाणी योजनेच्या कामांना विलंब करत आहेत. परंतु, ज्यांची २० लाख रु. खर्च करण्याची ताकद नाही अशाना पाच, दहा, वीस कोटी रुपयांचे कामे देण्यात आली आहेत. हा सगळा बट्याबोळ आहे. जलजीवन मिशन योजना ही राष्ट्रीय पेयजल योजनेसारखीच आहे. फक्त तिचे नाव बदलण्यात आले आहे. या योजनेच्या कामावर सरपंच, उपसरपंच व सदस्य तसेच ग्रामस्थानी योग्य प्रकारे लक्ष ठेऊन काम करून घ्या, असे आवाहन करताना कधी माझे ठेकेदाराशी देणेघेण नसते. मी प्रत्येक योजनेबाबत ठेकेदार व अधिकारी यांना सडेतोडपणे बोलत असतो. आपली बांधिलकी अधिकाऱ्याशी आहे. अधिकाऱ्यानी चांगले काम करून घ्यावे हीच अपेक्षा, असे
त्यांनी सांगितले. Bhoomipujan of Varveli Jaljeevan Nalpani Yojana

Tags: Bhoomipujan of Varveli Jaljeevan Nalpani YojanaGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share101SendTweet63
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.