जिल्ह्यातील सर्वात मोठी साडेसहा फुटी शाडू मातीची गणपती मूर्ती
गुहागर, ता. 04 : गुहागर वरचापाठ येथील स्वर्गीय नरेश वासुदेव शेटे व श्री. सुरेश शेटे कुटुंबीय यांच्या निवासस्थानी साडेसहा फुटी शाडू मातीचा गणपती विराजमान झालेला आहे. या गणपतीची प्रतिष्ठापना 21 दिवसांसाठी करण्यात आली असून त्या गणपती मूर्तिचे दि. 9 ऑक्टोबरला विसर्जन करण्यात येणार आहे. त्या गणपती सजावटीमधिल मोठा बुंदीचा लाडू ही आकर्षण ठरला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी शाडू मातीची गणपती मूर्ती असून बघण्यासाठी खूपच गर्दी होत आहे. Bharat Shete’s Ganpati is the best
यावेळी भरत शेटे यांनी सांगितले की, दरवर्षी आमच्याकडे मोठी शाडू मातीची गणपतीची मूर्ती असते. पण एवढी मूर्ती मोठी मूर्ती प्रथमच स्थापन केली आहे. ही मूर्ती विराजमान करण्यासाठी आमच्या वरचापाठ येथील मंडळांने मोलाची मदत केली. तरी दि. 9 ऑक्टोबर पर्यंत दर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हान त्यांनी केले आहे. या गणपतीचे मूर्तिकार नंदू शेठ बारटक्के व सोहम बारटक्के यांनी सांगितले की, रत्नागिरी जिल्ह्यात साडेसहा फुटी शाडू मातीची गणपती मूर्ती असलेला ही एकमेव मूर्ती आहे. ही मूर्ती बनवण्यासाठी तब्बल पंधरा दिवस गेले. या मूर्ती साडेसहा फूट असून याच वजन 450 किलो आहे. या मूर्ती बरोबरच यंदा आमच्या कारखान्यात 150 शाडू मातीचे गणपती 40 इको फ्रेंडली गणपती तसेच 100 पीओपी चे गणपती होते, अशी माहिती मूर्तिकारांनी दिली. Bharat Shete’s Ganpati is the best