रंगमंचाला नटवर्य शंकर घाणेकर नाव देणार; मंत्री उदय सामंत
रत्नागिरी, दि. 28 : रामटेकच्या कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्राचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे अध्ययन केंद्र असे नामकरण राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले. Bharat Ratna Dr. Pandurang Kane Such naming


मंत्री सामंत म्हणाले, सध्या जिथे उपकेंद्र आहे तिथे १८६३ मध्ये स्थापन झालेली शासकीय इंग्रजी माध्यमाची शाळा होती. तेथे डॉ. काणे १९०४ च्या सुमारास काही काळ अध्यापक होते. संस्कृतसाठी त्यांनी भरीव योगदान दिल्याबद्दल त्यांचे नाव दिले आहे. Bharat Ratna Dr. Pandurang Kane Such naming




या केंद्राच्या ताब्यातील ३५० आसन क्षमतेच्या सभागृहाच्या नुतनीकरणासाठी ८० लाख रुपये मंजूर करणार आहोत. या सभागृहात अद्ययावत यंत्रणा बसवून, तसेच इथल्या रंगमंचाला नटवर्य शंकर घाणेकर रंगमंच असे नाव देणार आहोत. त्यामुळे त्यांचीही स्मृती चिरकाळ राहील. हे मिनी नाट्यगृह अल्पदरामध्ये रंगकर्मींना नाटकाच्या तालमीसाठी व छोट्या कार्यक्रमासाठी दिले जाईल, अशी घोषणा मंत्री उदय सामंत यांनी आज केली. Bharat Ratna Dr. Pandurang Kane Such naming


एसटी स्टॅंडसमोरील अरिहंत मॉल येथील या उपकेंद्राच्या नामकरण समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर कुलगुरू डॉ. मधुसूदन पेन्ना, उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे आणि कुलसचिव डॉ. रामचंद्र जोशी, काणे यांचे नातेवाईक किरण काणे, तसेच सत्कारमूर्ती विनायक पोखरणकर गुरुजी, डॉ. विवेक भिडे आणि राजाभाऊ लिमये आदी मान्यवर उपस्थित होते. Bharat Ratna Dr. Pandurang Kane Such naming


जगातील एकमेव असे १५ कोटी रुपयांच्या छत्रपती शिवाजी महाराज संशोधन केंद्राचे भूमिपूजन पुढील १० दिवसांत करणार आहोत. संतपीठ असो वा संस्कृत विद्यापीठ या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत आहे. उपकेंद्रात कर्मचारी भरती करताना ९९ टक्के स्थानिकांना संधी देण्याची सूचना त्यांनी केली. Bharat Ratna Dr. Pandurang Kane Such naming


या वेळी कुलुगुरु डॉ. पेन्ना यांनी हे उपकेंद्र भारत आणि भारताबाहेरही आपला ठसा उमटवेल, अशी ग्वाही दिली. तसेच मोठ्या प्रमाणात संस्कृत आणि अन्य अभ्यासक्रमांकरिता मंत्रीमहोदयांनी दहा एकर जमिन उपलब्ध करून दिल्यास संस्कृत भवन उभारण्याकरिता प्रयत्न करू, असे सांगितले. Bharat Ratna Dr. Pandurang Kane Such naming


रामटेक येथील संस्कृत विश्वविद्यालयामध्ये डेटा सेंटर उभारण्याकरिताही निधी देण्याची मागणी त्यांनी केली. केंद्रासाठी आर्थिक तरतूद करताना काही अटी शिथील केल्यास आणखी चांगल्या पद्धतीने काम करता येईल, असेही त्यांनी आश्वासित केले. Bharat Ratna Dr. Pandurang Kane Such naming


याप्रसंगी काव्यतीर्थ विनायक पोखरणकर गुरुजी (ज्येष्ठ संस्कृत विद्वान), कीर्तनभास्कर हभप महेशबुवा काणे (संस्कृती संवर्धन), प्रियव्रत पाटील (युवा संस्कृत विद्वान), तन्मय हर्डीकर (युवा संस्कृत विद्वान), माधव आमशेकर (बाल संस्कृत विद्वान) आणि डॉ. विवेक भिडे (सामाजिक क्षेत्र) यांचा सन्मान केला. देवरुखच्या श्री गणेश वेदपाठशाळा (संस्था, वेदरक्षण) यांच्यावतीने रवींद्र साठे यांनी सन्मान स्वीकारला.


मराठी राजभाषा दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये, अरविंद कोकजे, राजेंद्रप्रसाद मसुरकर यांना सन्मानित करण्यात आले. Bharat Ratna Dr. Pandurang Kane Such naming


सत्कारमूर्ती पत्रकार प्रमोद कोनकर व सतीश कामत उपस्थित राहू शकले नाहीत. सत्कारमूर्तींच्या वतीने कीर्तनकार महेशबुवा काणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष आठवले यांनी केले. तसेच केंद्रसंचालक डॉ. मराठे यांनी आभार मानले. Bharat Ratna Dr. Pandurang Kane Such naming


Photo




Photo