भंडारी एकीकरण समितीच्या वतीने प्रदान
गुहागर, ता. 21 : भंडारी एकीकरण समितीच्या (Bhandari Integration Committee) वतीने भंडारी समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजातील व्यक्तींना भंडारी समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम संभाजी राजे सांस्कृतिक सभागृह मुलुंड पूर्व मुंबई येथे पार पडला. या सोहळ्यात गुहागर नगरपंचायतीच्या शिक्षण सभापती सुजाता बागकर यांना भंडारी समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. Bhandari Samajratna Award to Bagkar


तसेच याच कार्यक्रमात लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान संस्थेचे कार्याध्यक्ष साहिल आरेकर, श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पथसंस्थेचे अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांचाही भंडारी समाजरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. Bhandari Samajratna Award to Bagkar
या कार्यक्रमाला भंडारी एकीकरण समितीचे अध्यक्ष जयंत पाटकर, ओबीसी नेते राज राजापूरकर, समन्वयक भाई मांजरेकर, शैलेश पांजरी, सुनील वस्त, निमंत्रक योगेश मांजरेकर व कोकणातील भंडारी समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते. Bhandari Samajratna Award to Bagkar

