वेळंब येथील नांदलस्कर उद्योग समूहाचे यंत्र ग्राहकांसाठी उपयुक्त
गुहागर, ता. 16 : आतापर्यंत शेतकरी यंत्राचा वापर म्हटले की, पाठ फिरवत होता. पण आता परिस्थितीनेच यंत्राचा वापर करण्यास भाग पाडले आहे. आज गुहागरसारख्या भागात मजुरांची जागा यंत्राने घेतल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या अशा यंत्रांच्या जडणघडणीचे काम गुहागर तालुक्यातील शृंगारतळी वेळंब येथील नांदलस्कर उधोग समूहाचे नांदलस्कर इंजिनियरिंग वर्क्स करत आहे. नांदलस्कर यांनी तयार केलेले सुपारी फडसणी व सुपारी सोलनी यंत्र कोकणातील शेतकऱ्यांना अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. Betel nut peeling machine at Velamb


नांदलस्कर उद्योग समूहाचे नांदलस्कर इंजीनियरिंग वर्क्स 1984 पासून प्रभाकर विष्णु नांदलस्कर यांनी सुरू केले. तर आता त्यांचे सुपुत्र सुमित प्रभाकर नांदलस्कर हे काम पाहत आहेत. स्वतः वडिलांच्या हाताखाली प्रशिक्षण घेतलेले सुमित यांनी सध्या नवनवीन यंत्र विकसित करण्यावर भर दिला आहे. या वर्कशॉपमध्ये मरिनचे व चिरा खाणीची सर्व कामे केली जातात. या वर्क्स शॉप मधून यापूर्वी कातभट्टीचे सालपा मशीन, कात प्रेस यंत्र, सुपारीच्या झाडावर चढणे यंत्र, भात आणि नाचणीचे झोडणी यंत्र बनवले गेले आहेत. Betel nut peeling machine at Velamb


गुहागर तालुक्यात सुपारीची मोठ्या प्रमाणावर लागवड आहे. गुहागरची ओळखही नारळ- सुपारीच्या बागा म्हणून केली जाते. सुपारी पिकासाठी प्रसिध्द असणारे गुहागर तालुक्यातील पालशेत, वडद, गिमवी व काळसूरकौढर, गुहागर ही गावे ओळखली जातात. येथील बागायतदारांचे हमखास उत्पन्नाचे साधन म्हणून सुपारी पिकाकडे पाहिले जाते. गुहागर तालुक्यातील एकट्या पालशेतमध्ये दरवर्षी सुपारीचे पीक 70 ते 80 टन होते. त्या पाठोपाठ वडद व गुहागरचा नंबर लागतो. या गावातील अनेक बागायतदार गेली अनेक वर्षे पारंपरिक पद्धतीने सुपारी फडसणी व सोलनी करत होते. सुपारीचा हंगामा सुरू होताच मजुरांची टंचाई हे काही वर्षांपासून नित्याचे झाले आहे. तसेच मजुरांची मजुरीसुद्धा प्रचंड प्रमाणात वाढली आहे. सुपारी कातरताना होणारे तुकडे यामुळे मोठे नुकसान होते. त्यामुळे बागायतदार पारंपरिक पद्धतीपेक्षा आता आधुनिकतेची कास धरू लागला आहे. Betel nut peeling machine at Velamb


कोकणातील सुपारी बागायतदारांची हीच अडचण ओळखून व त्या अडचणी समजून घेऊन सुमित याने एक नवीन यंत्र बनवण्याचा निश्चय केला आणि त्यांनी सुपारी सोलनी यंत्र आणि सुपारी फडसणी यंत्र बनवले. या यंत्रामध्ये एका तासाला ५० किलो सुपारी सोलून होते. या यंत्रात सुपारी फुटीचे प्रमाण कमी आहे. या यंत्राची कोकणातील बागेतदारांकडून मोठ्या प्रमाणात मागणी सुरू आहे. आजपर्यंत १० सुपारी सोलनी यंत्रे तर १०० सुपारी फडसणी यंत्र तयार करून शेतकऱ्यांना देण्यात आली आहेत. या यंत्राचे सर्व पार्ट्स नांदलस्कर स्पेअर पार्टमध्ये उपलब्ध आहेत. ऑर्डर दिल्यानंतर आठ ते दहा दिवसांत ही यंत्रे तयार करून देण्यात येतात. Betel nut peeling machine at Velamb
या नवीन यंत्रामुळे नांदलस्कर उद्योग समूहाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. कोकणातील बागायतदारांना उपयोगी ठरेल अशी नवी यंत्रे भविष्यात बनविण्याचा मानस नांदलस्कर यांनी व्यक्त केला. Betel nut peeling machine at Velamb