शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशन ; गोवा येथे ५ जून रोजी पुरस्कार वितरण
गुहागर, ता. 11 : कोकणचे लोकप्रिय दैनिक सागरचे गुहागर तालुका प्रतिनिधी, विविध सामाजिक संस्थांवर क्रियाशीलपणे काम करणारे महाराष्ट्र शासनाचे अधिस्वीकृती पत्रकार श्री. गणेश अनंत धनावडे यांना शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशन मुक्ताईनगर जळगाव यांच्यावतीने २०२१- २०२२ या वर्षातील तापीपूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दि. ५ जून रोजी फोंडा- गोवा येथील अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनात होणार आहे. सदरील पुरस्कार हा राज्यातील दोन पत्रकारांना दिला जात आहे. Best Journalism Award to Dhanawade


शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी सामाजिक, आरोग्य, कला, अध्यात्मिक, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना विविध राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. या संस्थेच्या वतीने २०२१/ २०२२ या वर्षातील तापी पूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार श्री. धनावडे यांना जाहीर झाला आहे. Best Journalism Award to Dhanawade


श्री. धनावडे हे गेली २० वर्ष पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत दैनिक रत्नागिरी टाइम्स, प्रहार व सध्या दैनिक सागरमध्ये तालुका प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे व वैविध्यपूर्ण लेखण करून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना उचित प्रसिद्धी देऊन जनजागृतीचे व समाजप्रबोधनाचे कार्य केले. कृषीविषयक बातम्या देऊन महिला बचत गट व प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले. तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायत, माहितीचा अधिकार प्रचार – प्रचार संस्था, शिवतेज फाउंडेशन, महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान व अन्य विविध संस्थांच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू व आर्थिक मदत मिळवून देणे, शाळांना सहकार्य करणे, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. स्वच्छता अभियान, गणेशोत्सव काळात निर्मल गोळा करणे, गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार अशा एकूणच चौफेर कामगिरीचा दखल घेत शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशन तर्फे हा पुरस्कार दिला जात आहे. Best Journalism Award to Dhanawade
तापीपूर्णा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार हा राज्यातील दोन पत्रकारांना दिला जात आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल गणेश धनावडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. Best Journalism Award to Dhanawade