• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चंद्रभागा गॅस सर्व्हिसेसला उत्कृष्ट वितरक पुरस्कार

by Ganesh Dhanawade
November 17, 2023
in Guhagar
115 1
0
Best Distributor Award to Chandrabhaga Gas Services

उत्कृष्ट वितरक पुरस्कार स्वीकारताना चंद्रभागा गॅस सर्व्हिसेसच्या संचालक श्रीम. संगिता हळदणकर.

225
SHARES
643
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर गॅसधारकांना २२ वर्ष विनम्र व तत्पर सेवा

गुहागर, ता. 17 : हिंदुस्थान पेट्रोलियमच्या गुहागरातील गॅस वितरक चंद्रभागा गॅस सर्व्हिसेसला सन २०२२-२३ चा सातारा झोनल मधील उत्कृष्ट वितरक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी चंद्रभागा गॅस सर्व्हिसेसच्या संचालक श्रीमती संगिता हळदणकर यांना हिंदुस्थान पेट्रोलियमचे पुणे रिजीनलचे सेल्स ऑफिसर राकेश महेश्वरी, साताऱ्याचे झोनल ऑफिसर प्रभात कुमार आणि मुंबईतील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विविध चार पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. Best Distributor Award to Chandrabhaga Gas Services

गुहागर सारख्या दुर्गम आणि डोंगराळ तालुक्यात गेली २२ वर्ष हिंदुस्थान पेट्रोलियमचे गॅस वितरक म्हणून चंद्रभागा गॅस सर्व्हिसेस या एजन्सीने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. हा तालुका दुर्गम आणि डोंगराळ असतानाही गॅसधारकांना विनम्र व तत्पर सेवा दिली जात आहे. म्हणूनच गेल्या काही वर्षात या गॅस सर्व्हिसेसला हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीने अनेक पुरस्कार देऊन सन्मानीत केले आहे. त्याच अनुषंगाने कंपनीने यावर्षी २०२२-२३ चा उत्कृष्ट वितरक पुरस्कार तसेच उत्तम सर्व्हिसेस, बेस्ट रनर आणि या झोनमधील सुमारे २०० वितरकांमध्ये शोरुमच्या माध्यमातून कंपनीचे सर्वाधिक साहित्य वितरक म्हणून पुरस्कार प्रदान केले आहेत. मिळालेले सर्व पुरस्कार हे चंद्रभागा गॅस सर्व्हिसेसच्या व्यवस्थापनाचे व कर्मचाऱ्यांचे सामुहिक यश असल्याचे चंद्रभागा गॅस सर्व्हिसेसच्या संचालक श्रीमती संगिता हळदणकर यांनी सांगितले. Best Distributor Award to Chandrabhaga Gas Services

Tags: Best Distributor Award to Chandrabhaga Gas ServicesGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share90SendTweet56
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.