नगरपंचायत गुहागर व बोरोसिल कंपनीकडून आयोजन
गुहागर, ता. 21 : गुहागर बाजारपेठ ते दुर्गादेवी देवस्थान पर्यंत समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम उद्या गुरुवार दिनांक 22 रोजी सकाळी 7.30 वाजता राबवण्यात येणार आहे. या स्वच्छता मोहिमेला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गुहागर नगरपंचायत चे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण, नगराध्यक्ष नीता मालप व बोरोसिल कंपनी यांनी केले आहे. Beach cleaning campaign

गुहागर समुद्रकिनारी ब्लू फ्लॅग पायलट दर्जा मिळणार आहे. यासाठी समुद्रकिनारी विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. यातच उद्या सकाळी नगरपंचायत बोरोसिल कंपनी कॉलेज नागरिक यांच्या वतीने समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या स्वच्छता मोहिमेला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गुहागर नगरपंचायत चे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण, नगराध्यक्ष नीता मालप व बोरोसिल कंपनी यांनी केले आहे. Beach cleaning campaign
