गुहागर, ता. 30 : सामाजिक दायित्व निभावण्याचा संस्कार व्हावा म्हणून महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला रिगलच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता उपक्रम केला. शनिवार, रविवार गुहागरला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असते. म्हणून गुहागरच्या समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता या विद्यार्थ्यांनी केली. अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. रेश्मा मोरे यांनी दिली. Beach Cleaning By Regal College
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने श्रृंगारतळीमधील रिगल कॉलेजमधील हॉटेल मॅनेजमेंट आणि संगणक विभागाचे (बिसीए) विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिम राबवली. गुहागर बाजारपेठ परिसरातील समुद्रकिनारा (Guhagar Beach) स्वच्छ केला. या स्वच्छता मोहिमेत गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, नगरसेविका सौ. भाग्यलक्ष्मी कानडे, भाजपचे गटनेते उमेश भोसले सहभागी झाले होते.स्वच्छता अभियानमध्ये रिगल कॉलेज श्रुंगारतळी मधील सर्व विद्यार्थी, प्रा. समीरा नरवणकर, प्रा. सोनल पाटील, प्रा. शैलेश घाणेकर उपस्थित होते.
रिगल कॉलेज शृंगारतळी च्या संचालिका डॉ.सुमिता शिर्के व प्राचार्या सौ.रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. गुहागर नगरपंचायतीमधील सुनील नवजेकर, ओंकार लोखंडे, प्रज्ञेश तांडेल, विनोद लोखंडे, लक्ष्मण कोकरे यांचे या उपक्रमाला मोलाचे सहकार्य लाभले. त्याबद्दल रिगल कॉलेजने त्यांचे आभार मानले. Beach Cleaning By Regal College
रिगल कॉलेजविषयी जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.