चित्र साकारून केली बाप्पाची अनोखी सेवा
गुहागर, ता. 25 : देवाची सेवा करताना भक्त मोदक, लाडू, फुलांचे हार, सोन्या चांदीचे दागिने, आकर्षक मखर अशा अनेक प्रकारे सेवा करतात. परंतु देवरुख-रत्नागिरी येथील तरुण कलाकार विलास रहाटे यांनी गणेशोत्सवानिमित्ताने एका छोट्याशा सुपारीवर ॲक्रॅलिक कलर च्या साह्याने गणेशाचं चित्र सकारलं आहे. Bappa’s picture drawn on betel nut


विलास रहाटे हे नेहमीच आपल्या कलेत नावीन्यपूर्ण प्रयोग करत असतात. बाप्पाच्या रेखणीच्या कामातून विसावा मिळाल्यावर विलास यांनी आपल्या कल्पनाशक्तिच्या सहाय्याने बाप्पाची अनोखी सेवा केली आहे. धार्मिक कार्यात सुपारीला गणपतीचं स्थान दिले जात तिची पूजा केली जाते. या विचाराने त्यांनी छोट्याशा सुपारीवर गणेशाचं चित्र सकारलं. Bappa’s picture drawn on betel nut


यापूर्वीही विलास रहाटे यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठू माऊलीचे रूप तुळशीच्या पानावर साकारले होते. या तुळशीपत्राचे फोटो व विडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. तसेच श्री स्वामी समर्थ व देवीचे चित्र भक्ताच्या मागणीवरून सुपारीवर साकारले होते. चित्रकार, कला मार्गदर्शक, रांगोळी कलाकार अशी ओळख असणारे विलास नेहमीच आपल्या कलेच्या माध्यमातून वेगळेपण साकारण्याचा प्रयत्न करत असतात. Bappa’s picture drawn on betel nut

