गुहागर, ता. 24 : बॅंक ऑडिटच्यापूर्वी काही आवश्यक गोष्टी सीएंकडून प्राप्त झाल्यास कामात अधिक सुधारणा करता येतील. सध्या बॅंकिंग क्षेत्रातही मोठी स्पर्धा आहे. बॅंकेचे सिस्टीम ऑडिटही केले जाते. आता नवनवीन तंत्रज्ञान, नव्या संकल्पना येत आहेत. त्यामुळे दोन्ही घटकांनी आपण ऑडिटला तयार आहोत का व त्या जबाबदारीला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन बॅंक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर केशव कुमार यांनी केले. Bank Audit Workshop at Ratnagiri


सीए इन्स्टिट्यूटच्या (CA Institute) रत्नागिरी शाखेतर्फे आयोजित वैधानिक बँक शाखा ऑडिट कार्यशाळेत ते बोलत होते. हॉटेल व्यकंटेश येथे आयोजित एक दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन श्री. केशव कुमार यांनी दीप्रज्वलनाने केले. ते म्हणाले की, जनतेचे पैसे बॅंकेत असतात आणि ते विश्वासाने ठेवलेले असतात. त्यामुळे त्यांचा हिशेब अचूकच असला पाहिजे. याकरिता बॅंक ऑडिट केले जाते. यामध्ये आढळणाऱ्या त्रुटी सांगून त्या सुधारल्या जातात. त्यामुळे बॅंकर्स व सीए हे दोन्ही घटक जनतेच्या पैशांचे विश्वस्त आहेत. Bank Audit Workshop at Ratnagiri
याप्रसंगी सीए इन्स्टिट्यूटच्या (CA Institute) रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षपदी सीए प्रसाद आचरेकर यांनी प्रास्ताविकामध्ये सीए इन्स्टिट्यूटतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याचे सांगितले. एप्रिल महिन्यात सर्वच बॅंकांची ऑडिट सुरू असतात. त्यामुळे तत्पूर्वी मार्गदर्शनाकरिता विशेष कार्यशाळा आयोजित केल्याचे ते म्हणाले. Bank Audit Workshop at Ratnagiri
या दिवसभरात तांत्रिक मार्गदर्शनाची सत्रे झाली. यामध्ये सीए शशांक पत्की यांनी बॅंकांचे लेखापरीक्षण करताना करावयाचे नियोजन व लॉंग फॉर्म ऑडिट रिपोर्ट यावर सखोल मार्गदर्शन केले. सीए नितांत त्रिलोकेकर यांनी सीबीएस प्रणाली अंतर्गत गैरव्यवहार कसे ओळखावे यावर मार्गदर्शन केले. सीए रुता चितळे यांनी बॅंकांची कर्जे व त्यांचे पुनर्गठन यातील प्रकरणांवर विवेचन केले. खजिनदार सीए केदार करंबेळकर यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी उपाध्यक्ष सीए मुकुंद मराठे, कार्यवाह सीए अक्षय जोशी, विकासा चेअरमन सीए सौ. अभिलाषा मुळ्ये यांच्यासह रत्नागिरीतील सीए उपस्थित होते. Bank Audit Workshop at Ratnagiri

