बळीराज सेना पक्षप्रमुख अशोक वालम यांचा इशारा
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 06 : आपण स्वतः कसे मोठे व्हायचे शेतकरी मेला तरी चालेल, कोणाला कसली पडलेली नाही? म्हणूनच बळीराज सेनेने असा विचार केला की, आपण सगळ्या नेत्यांनी पूर्ण कोकणचा दौरा करायचा, शेतकऱ्यांशी संपर्क साधायचा, कशा पद्धतीने नुकसान झाले आहे. कशा पद्धतीने त्यांची हाणी झालेली आहे.? किती नुकसान झाले आहे. याची आंम्ही माहिती घेतोय आणि येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत बसून त्याच्यावर आम्ही चर्चा करणार आहोत. कोकणला आम्हाला न्याय देणार कोण? कोकणच्या शेतकऱ्यांना न्याय देणार कोण? हा आम्ही त्यांना जाब विचारणार,? आणि तरी पण नाही दखल घेतली तर मात्र शेतकऱ्यांसाठी बळीराजा सेनेच्या वतीने मोठा आंदोलन उभं करू, असा गंभीर इशारा शासनाला बळीराज सेनेचे पक्षप्रमुख अशोक (दादा) वालम यांनी गुहागर दौऱ्यावर आले असता आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला. Baliraj Sena party chief Ashok Valam visits Guhagar

यावेळी गुहागर येथे दौऱ्यावर आले असता आमच्या प्रतिनिधीशी बोलताना बळीराज सेना पक्षप्रमुख अशोक (दादा) वालम पुढे म्हणाले की, सध्या कोकणात पडतोय तो अवकाळी पाऊस नसून हा वाढीव पाऊस आहे. पाच महिने सतत तो पडतोय आणि पावसाने कोकणातील असलेली भात शेती असेल नाचणी, वरी जी काय पिके आहेत. ती उध्वस्त झालेली आहेत. हवामान खात्याने पावसाचा अंदाज डिसेंबर पर्यंत दिला आहे. यामुळे येणारा आंबा, काजू हे पीक सुद्धा पूर्ण नष्ट होणार आहे. शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. आजपर्यंत कोकणातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही. पण जर शासनाने लक्ष दिले नाही तर मात्र शेतकऱ्यांवर नक्की आत्महत्या करण्याची कोकणात परिस्थिती निर्माण झालेली आहे. याला सर्वस्वी इथले राजकारणीच जबाबदार आहेत. Baliraj Sena party chief Ashok Valam visits Guhagar
असा स्पष्ट इशारा देत अशोक (दादा) वालम पुढे म्हणाले की, आज बघा ना? पश्चिम महाराष्ट्र असू दे, विदर्भ मराठवाडा असू दे, तिकडच्या शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू असतील किंवा अनेक काही लोक असतील, ते आंदोलन उभं करत आहेत शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करतायेत. शेतकऱ्यांचा 7/12 जर कोरा झाला तर आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांना त्याचा काही फायदा होणार नाही. इकडच्या लोकप्रतिनिधींनी मग आमदार, खासदार, मंत्री, पालकमंत्री असतील त्यांनी याची दखल घेतली पाहिजे होती. त्यांनी स्वतःहून यासाठी नियोजन केले पाहिजे होते. पण कोण करत नाही? असा आरोपही बळीराज सेनेचे पक्षप्रमुख अशोक (दादा) वालम यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला. Baliraj Sena party chief Ashok Valam visits Guhagar

यावेळी अशोक दादा वालम यांच्यासोबत बळीराज सेनेचे जिल्हा प्रमुख पराग कांबळे, सरचिटणीस संभाजी काजरेकर, शामराव पेजे महामंडळ अध्यक्ष डॉ. प्रकाश भांगरथ, विधानसभा संपर्क प्रमुख शरद बोबले, सह संपर्कप्रमुख मनोहर घुमे, अमित काताळे, तालुकाध्यक्ष अरुण भुवड, महिला आघाडी अध्यक्ष श्रावणी शिंदे, विधानसभा महिला आघाडी प्रमुख ऐश्वर्या कातकर, सचिव स्वप्नाली डावल, तालुका सचिव श्वेतांबरी मोहिते, लोटे विभाग प्रमुख सुभाष हुमणे, तालुका उपाध्यक्ष संतोष पाष्टे, युवक अध्यक्ष विवेक जांगली, तृप्ती शिगवण, गजानन मांडवकर, विनायक घाणेकर, नामदेव अवेरे यांचेसह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. Baliraj Sena party chief Ashok Valam visits Guhagar
