गुहागर, ता. 25 : श्री देव व्याडेश्वर देवस्थान, गुहागर यांच्या वतीने सोमवार दि. 29/08/22 रोजी आयुर्वेदिक चिकित्सा शिबिर आयोजित केले आहे. हे शिबीर परशुराम सभागृह, व्याडेश्वर देवस्थान, गुहागर येथे सकाळी १० ते 1 या वेळेत घेण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये संधिवात तसेच अन्य वाताचे विकार, त्वचारोग आणि पचनाचे विकार यावर आयुर्वेदिक सल्ला आणि औषधे दिली जाणार आहेत. तरी सर्वांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन व्याडेश्वर देवस्थानाकडून करण्यात आले आहे. Ayurvedic Medical Camp in Guhagar

या शिबिरासाठी लाभार्थ्यांनी लवकरच 9168240901 या नंबर वर फोन करून नाव नोंदणी करावयाची आहे. श्री देव व्याडेश्वर देवस्थान, गुहागर यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या या शिबिराचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी सहभाग घ्यावा, व आपले आरोग्य सुदृढ ठेवावे. अशी विनंती व्याडेश्वर देवस्थान कडून करण्यात आली आहे. Ayurvedic Medical Camp in Guhagar

